Actress Madhuri Dixit Twitter/@AnjuAga69419511
मनोरंजन

Madhuri Dixit: धकधक गर्लवर कोसळला दुखा:चा डोंगर, आई स्नेहलता दीक्षित याचं निधन

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

दैनिक गोमन्तक

Madhuri Dixit Mother Passed Away: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेनेला मातृशोक झाला आहे. माधुरीची आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी 8.40 वाजता निधन झाले आहे.

त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3.40 च्या दरम्यान मुंबईतील वरळी इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने माधुरी आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

91 वर्षांच्या स्नेहलता दीक्षित यांच्या मृत्यूचे कारण अद्याप माध्यमांसमोर आलेले नाही. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी संयुक्त निवेदनात ही दुःखद बातमी शेअर केली. 

गुलाब गँग 2013 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटातील हा किस्सा आहे. अनुभव सिन्हा या चित्रपट निर्मात्याने याबद्दल सांगितलं आहे.''जेव्हा आम्ही चित्रपटातील गाणे गाण्यासाठी माधुरीशी संपर्क साधला तेव्हा तिने आनंदाने होकार दिला.

माधुरी दीक्षित जेव्हा रेकॉर्डिंगसाठी आली तेव्हा त्यांची आई सोबत होती. त्यावेळी आम्हाला कळलं की, त्या खूप चांगल्या गायिका आहे. म्हणून आम्ही माधुरीच्या आईला विचारलं की त्या गाणं गाऊ शकतं का?. अखेरीस, आम्ही माधुरी आणि तिची आई दोघांनाही चित्रपटात गाणं गायला लावलं.

माधुरीसाठी तिची आई एक जिवलग मैत्रिण होती. युष्यातील प्रत्येक वळणावर तिला आई स्नेहलता यांची साथ लाभली. त्यामुळे आता आईच्या अचानक जाण्याने माधुरीच्या आयुष्यात न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT