India Lockdown In IFFI Goa  Dainik Gomantak
मनोरंजन

53rd Iffi Goa: मधुर भांडारकर यांच्या 'इंडिया लॉकडाऊन'चा इफ्फीत वर्ल्ड प्रीमियर 

चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याने जगातील प्रत्येक जण या चित्रपटाशी रिलेट करू शकतो.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात 20 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) (IFFI 53rd edition) सुरू होत आहे. इफ्फीत हिंदी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांच्या 'इंडिया लॉकडाऊन' (India Lockdown) या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. झी फाईव्ह या डिजिटल ओटीटी प्लॅटफॉर्म वरती याबाबत घोषणा करण्यात आली आहे. इंडिया लॉकडाऊन हा चित्रपट कोरोना काळात भारतात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. 

इंडिया लॉकडाऊन या चित्रपटाची पटकथा दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यासह अमित जोशी आणि आराधना सहा यांनी लिहिली आहे. चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याने जगातील प्रत्येक जण या चित्रपटाशी रिलेट करू शकतो. असे मत भंडारकर यांनी व्यक्त केले आहे. भारतात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि अवघे चित्र बदलून गेले. अनेक कुटुंबांना कोरोनामुळे आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. याशिवाय अनेकांनी आपल्या प्रियजनांना देखील गमावले आहे. हा चित्रपट देखील कोरोना काळातील सत्य घटनांवर आधारित असल्याने प्रत्येकाला जवळचा वाटेल असे भंडारकर म्हणाले. 

मधुर भांडारकर यांची एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून ओळख आहे, त्यांनी चांदणी बार, ट्रॅफिक सिग्नल आणि फॅशन यासारखे चित्रपट तयार केले आहेत. हिंदी इंडस्ट्री वेगळी ओळख असलेल्या भंडारकर यांच्या चित्रपटाची उत्सुकता त्यांच्यासह अनेक सिनेरसिकांना लागली आहे. इफ्फीतील वर्ल्ड प्रीमियर झाल्यानंतर हा चित्रपट दोन डिसेंबर पासून झी फाईव्ह या ओटीपी प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध होणार आहे. 

इंडिया लॉकडाऊन या चित्रपटात अभिनेता प्रतिक बब्बर, सई ताम्हणकर, श्वेता बसू प्रसाद, प्रकाश बेलवाडी आणि आहाना कुमरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. IFFI मधील इंडिया लॉकडाऊनच्या प्रीमियरसाठी सर्वजण उत्साहित आहेत, असे ZEE5 इंडियाचे चीफ बिझनेस ऑफिसर मनीष कालरा म्हणाले. इफ्फीत इंडिया लॉकडाऊनसह एस एस राजामौली यांचा आर आर आर, मराठी चित्रपट धर्मवीर, विवेक अग्निहोत्री यांचा द कश्मीर फाइल्स आणि बंगाली चित्रपट टॉनिक देखील प्रदर्शित होणार आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SCROLL FOR NEXT