Actress Dia Mirza Dainik Gomantak
मनोरंजन

दियाने दिला बाळाला जन्म, शेअर केला मुलाचा पहिला फोटो

दियाने प्रीमॅच्युअर (Premature baby) बाळाला जन्म दिला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री दिया मिर्झाने (Dia Mirza) मुलाला जन्म दिला आहे. तिने ही चांगली बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. दीयाने मुलाच्या फोटोसह एक निवेदन शेअर केले आहे आणि सांगितले आहे की आई आणि मूल दोघेही ठीक आहेत. दीयाचे हे पोस्ट शेअर केल्यानंतर चाहते आणि कलाकार तिचे अभिनंदन करत आहेत.दियाने प्रीमॅच्युअर (Premature baby) बाळाला जन्म दिला आहे. (Little member came to Dia Mirza house actress gave birth to a son)

दीयाने मुलाचा हात धरलेला एक फोटो शेअर केला आहे. इतकेच नाही तर तिने चाहत्यांना आपल्या मुलाचे नावही सांगितले आहे. दीयाने आपल्या मुलाचे नाव अव्यान (Avyaan Azaad Rekhi) आझाद रेखी असे ठेवले आहे. दियाने दिलेल्या माहितीनुसार तिने मुलाला 14 मे रोजी झाला. दियाच्या बाळाला NICU मध्ये ठेवण्यात आलं होतं दोन महिन्यांनंतर दियाने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

दियाने दिलेल्या माहितीनुसार, दियाला गरोदरपणात बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं होत. त्यावेळी दियाची तब्बेत खूप खराब होती. अशावेळी तात्काळ (C-Section) द्वारे दियाच्या बाळाचा जन्म झाला. ड्यू डेटच्या अगोदरच बाळाचा जन्म झाल्यामुळे त्याला NICU मध्ये ठेवण्यात आलं आहे.

दियाने फोटो शेअर करत लिहिले -मला माझ्या चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. आपली चिंता आमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे, जर यापूर्वी ही बातमी सांगणे शक्य झाले असते तर आम्ही ती नक्कीच शेअर केली असती . आपण प्रेम, विश्वास आणि प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद.अनेक सेलिब्रिटींनी दियाच्या पोस्टवर कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT