बॉलिवूडचा (bollywood) प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) निर्मितीत (production) तयार झालेला चित्रपट (Movie) म्हणजे 'लगान' (Lagan) आज चित्रपटाला तब्बल 20 वर्ष पूर्ण झाले आहेत.लगान या चित्रपटाने 20 वर्षांपूर्वी यशाचे झेंडे फडकावले होते. या भव्य चित्रपटाचे दिग्दर्शक (Director) आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) होते. या चित्रपटासाठी आशुतोष आणि आमिर खान या दोगांना 'बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म' (Best Foreign Language Film) साठी ऑस्कर पूरसाकार (Oscar award) मिळाला होता . हा सिनेमा ऑस्कर जिंकू शकला नसला, तरी इतर सर्व पुरस्कार या चित्रपटाने जिंकले होते .शूटिंगदरम्यान आमिर आणि किरण राव यांच्यामध्ये जवळीक वाढली होती. माहितीनुसार अमीर खान म्हणतो की, चित्रपटाशी संबंधित बर्याच आठवणी नेहमी त्याच्यासोबत असतात. पण सर्वात खास क्षण होता जेव्हा पहिली पत्नी रीनाचे पत्र आले.(The letter was written by Aamirs ex-wife for Lagaan)
आमिरच्या म्हणण्यानुसार, एका रात्री मी तिला सांगितले की तु हा चित्रपट निर्मित करावा,मग त्यास रीना ने नकार दिला,कारण तिला चित्रपट निर्मितीबद्दल काहीच माहिती नव्हते जे पूर्णपणे सत्यही होते. पण आमिरसाठी रीनाने प्रॉडक्शन वर्क केले आणि त्यासाठी तिने खास तयारी केली होती. यासाठी रीना सुभाष घई सारख्या लोकांना भेटली आणि चित्रपट निर्मिती समजण्याचा प्रयत्न केला.
आमिरसाठी रीनाने केले होते हे काम
आमिरच्या म्हणण्यानुसार, रीनाने मोठ्या प्रयत्नातून फिल्म मेकिंगच्या गोष्टी शिकली होती, ती खूप कडक निर्माती होती, सर्वांना खूप ओरडायची. ती मला देखील ओरडायची . जेव्हा हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हा रीनाने एक पत्र लिहिले होते मला अद्याप संपूर्ण पत्र आठवत नाही, परंतु यामध्ये तिने अशा कठीण परिस्थितीत चित्रपट बनवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि आपल्या आरडाओरडीबद्दलही सांगितले, ते पत्र खूप भावनिक होते . आम्ही सर्व चित्रपट क्षेत्रातूनच होतो , पण रिनाने जे काही केले ते चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर नव्हते. मी ते पत्र वाचून रडलो होतो .
आजपर्यंत कोणताही चित्रपट लगान ला टक्कर नाही देऊ शकला , उत्तम कथा, संगीत, ब्रेकग्राउंड स्कोअर,यांना तोड नाही. आमिर खानच्या प्रॉडक्शनच्या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडक दिली.या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर खान आणि किरण राव एकमेकांच्या जवळ आले आणि आमिरने रीनाला घटस्फोट देऊन किरण रावशी लग्न केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.