Lata Mangeshkar Dainik Gomantak
मनोरंजन

Lata Mangeshkar यांचे राहते घर सील करण्यात आले जाणून घ्या कारण

(Lata Mangeshkar ) मंगेशकर कुटुंबाने प्रसिद्ध केले एक अधिकृत निवेदन

दैनिक गोमन्तक

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) राहत असलेल्या निवासी इमारतीला मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोविड -19 (Covid 19) महामारी साथीच्या विरूद्ध खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आले आहे. जेष्ट गायिका लता मंगेशकर आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असून, केवळ सावधगिरीचा उपाय म्हणून इमारत सील करण्यात आली आहे.

मंगेशकर कुटुंबाने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले, ज्यात लिहिले आहे की, “प्रभकुंज सीलबंद आहे की नाही याबाबत आम्ही संध्याकाळी फोन करून चौकशी केली दरम्यान बिल्डिंग आणि सोसायटी बीएमसीने कोविड -19 महामारी साथीच्या विरूद्ध खबरदारीचा उपाय म्हणून सील केली आहे. कारण आमच्या घरी आणि इमारतीत ज्येष्ठ नागरिक असून, ही खबरदारी घेणे बंधनकारक आहे.

आमचा नेहमीचा गणेशोत्सव देखील यावेळी घरगुती पद्धतीने होणार असून, याबाबत आम्हाला सहकार्य करा आणि सामाजिक अंतराचे पालन करा. सर्व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. याकरिता इतर सर्व निवासी सदस्यांचे सहकार्य देखील आवश्यक आहे. देवाच्या कृपेने आणि अनेकांच्या इच्छेमुळे, मंगेशकर कुटुंब सुरक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT