The Kapil Sharma Show Dainik Gomantak
मनोरंजन

The Kapil Sharma Show: 'या' लोकप्रिय कॅामेडियनने सोडला द कपिल शर्मा शो

The Kapil Sharma Show: टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो द कपिल शर्माचा नवा सीझन लवकरच टीव्हीवर पुन्हा सुरु होणार आहे.

दैनिक गोमन्तक

The Kapil Sharma Show: टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो द कपिल शर्माचा नवा सीझन लवकरच टीव्हीवर पुन्हा सुरु होणार आहे. हा शो सप्टेंबरमध्ये प्रसारित होणार आहे. पण यातलीच ताजी बातमी म्हणजे या शोमधील 'सपना' म्हणून ओळखला जाणारा कृष्णा आता आगामी सीझनचा भाग नसणार आहे. होय ,तुम्हालाही वाचून धक्का बसला असेल ना ,पण हे अगदीच खर आहे. यावेळी तो कपिलच्या शोमध्ये दिसणार नसून , कृष्णाने स्वत: या शोचा भाग नसल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, या वर्षी जूनमध्ये शेवटच्या प्रसारित झालेल्या कपिल शर्मा शोच्या सीझनमध्ये कृष्णा दिसला होता. त्यानंतरही तो कपिल शोच्या क्रू मेंबर्ससोबत कपिल शर्मा लाइव्ह शोसाठी कॅनडा (Canada) आणि यूएसला (USA) गेला होता. या शोमध्ये कृष्णाने जॅकी दादा, धर्मेंद्र आणि सपनासह अनेक पात्रे साकारल्यानंतर कृष्णा द कपिल शर्मा शोमध्ये चाहत्यांचा आवडता कलाकार बनला होता. पण यावेळी तो या शोमध्ये नसल्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच त्रास होणार आहे.

दुसरीकडे, द कपिल शर्मा शोचा (The Kapil Sharma Show) नवा सीझन न करण्याबाबतचा खुलासा कृष्णाने केला. शोच्या कराराबद्दल काही कारण असल्याच समजतयं. शोमध्ये कृष्णाची अनुपस्थितीमुळे प्रेक्षक सपनाच्या पात्राला नक्कीच मिस करतील. कारण सपना ही व्यक्तिरेखा चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती. यावेळी शोमध्ये नवीन कलाकारही सहभागी होणार आहेत.

याशिवाय, सीझनमध्ये कपिल शर्माचा लूक देखील नवा राहणार आहे. कपिल शर्माने त्याच्या या नव्या लूकची झलक शेअर केली असून ,यात कपिलने आपली हेअरस्टाईल बदललेली दिसत आहे. यावेळी त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पॅन्टसह पांढरे ब्लेझर घातलेले असून त्याच्यासोबत अर्चना पूरण सिंग देखील दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT