Akshay Kumar Dainik Gomantak
मनोरंजन

Akshay Kumar Threatened: अक्षय कुमारने या अभिनेत्याला ठार मारण्याची धमकी दिली होती?...

अभिनेता अक्षय कुमारने या अभिनेत्याला ठार मारण्याची धमकी दिली होती अशी चर्चा सध्या सुरुय.

Rahul sadolikar

Akshay Kumar Threatened KRK: बॉलीवूडच्या खिलाडी कुमारला आता एका मोठ्या आरोपाला सामोरं जावं लागत आहे. अक्षय कुमारने मला ठार मारण्याचा प्लॅन बनवला होता असा आरोप एका अभिनेत्याने अक्षय कुमारवर केला आहे.

अभिनेता आणि स्वत:ला चित्रपट समीक्षक मानणारा कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके हा मनोरंजन विश्वातील एक असा व्यक्ती आहे जो स्वत: नेहमी असं काही ना काही करतो की चर्चेत राहतो.

तो नेहमीच त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. त्यांची विधाने अशी असतात की त्यामुळे तो अनेकदा अडचणीत येतात.

थेट खिलाडी कुमारवर आरोप

केआरके बद्दल बोलायच झालं तर तो नेहमीच त्याच्या ट्विटमुळे चर्चेत असतो. तो अनेक कलाकारांवर टिका देखील करत असतो.

त्यामुळे तो अडचणीत देखील सापडतो. आता तर त्याने कहर केला. त्याने बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षयवर असे काही आरोप केले की त्यामुळे पून्हा ते अडचणी येण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केआरकेनं त्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगितलं आहे.

तुरुंगातच खुन करायचा होता

केआरकेने आपल्या नव्या ट्विटद्वारे अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासे केले आहे. KRK च्या म्हणण्यानुसार अक्षय कुमार त्याला जीवे मारण्यासाठी सुपारी देतो. इतकच नाही तर अक्षयला तुरुंगातच त्याचा खून करायचा होता. पण तो बाहेर आला.

सर्वांशी चांगले संबंध ;पण

मात्र आता अक्षय कुमारनं पुन्हा एकदा त्याच्या नावाची सुपारी दिली असून त्याला तुरुंगात किंवा पोलीस ठाण्यात त्याचा खुन करण्याची योजना आखत असल्याचा आरोप त्याने केलं आहे.

केआरकेच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, बॉलिवूडमधील सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत त्याला फक्त अक्षय कुमार हाच एकमेव अपवाद असल्याच सांगितलं! त्यानेच मला तुरुंगात मारण्याची सुपारी दिली होती आणि मला अटक केली होती.

मला तुरुंगात मारण्याची धमकी

मी खुप भाग्यवान होतो म्हणुन तुरुंगातून बाहेर पडलो. तो पुन्हा मला पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात मारण्याची सुपारी देत ​​आहे.

मला काही झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी अक्षय कुमार असेल. माझ्या हत्येशी सलमान खान, शाहरुख खान आणि करण जोहर यांचा काहीही संबंध नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT