Kriti Sanon Dainik Gomantak
मनोरंजन

Kriti Sanon in 2024: आदिपुरुषनंतर क्रिती करणार मोठी घोषणा; 2024 ला...

Kriti Sanon: यादरम्यानच तिचे नाव दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत देखील जोडले गेले.

गोमन्तक डिजिटल टीम

Kriti Sanon in 2024: हीरोपंती या चित्रपटातून 2014 ला पदार्पण केलेल्या क्रिती सेनन सध्या आदिपुरुष या तिच्या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

गेल्या काही वर्षात तिचे काही चित्रपट हिट झाले तर काही चित्रपट फ्लॉफ झाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यानच तिचे नाव दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबतदेखील जोडले गेले.

आता मात्र आदिपुरुषनंतर क्रिती मोठी घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. आता अॅक्टिंगमध्ये जम बसवल्यानंतर क्रिती निर्माता म्हणून नवीन जबाबदारी उचलणार असल्याची माहीती समोर येत आहे.

महत्वाचे म्हणजे चित्रपट निर्माण करण्याबरोबरच क्रिती स्वत: या चित्रपटात काम करतानादेखील दिसून येणार आहे.

समोर आलेल्या माहीतीनुसार, क्रिती एका डिजिटल चित्रपटावर काम करत आहे. गेल्या काही काळापासून क्रितीने प्रोडक्शनसहित चित्रपटाच्या निर्मितीच्या विविध पैलूंवर समजून घेण्यास सुरुवात केली आहे.

अलिकडेच तिच्याकडे अशी एक स्क्रीप्ट आली त्यावर तिने काम करण्याचा, चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने ओटीटी प्लॅटफॉर्मबरोबरदेखील चर्चा केली आहे.

त्यामुळे क्रितीने प्रोड्यूस केलेला पहिला चित्रपट 2024 ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज होण्याची मोठी शक्यता आहे. तिचा याआधीचा मिमि हा चित्रपटदेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज झाला होता.

  • 2024 ला दहा वर्षे पूर्ण

योगायोग म्हणजे ज्यावेळी 2024 ला क्रितीने प्रोड्यूस केलेला पहिला चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा क्रितीला बॉलीवूडमध्ये पदार्पण करुन 10 वर्षे पूर्ण होतील.

  • आदीपुरुषनंतर 'या' चित्रपटात दिसणार क्रिती

क्रितीची मुख्य भूमिका असलेला आदिपुरुष हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतरदेखील क्रिती विविध चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. यामध्ये शाहिद कपूरसोबत एक अनटाइटल्ड फिल्म, करीना कपूर खान आणि तब्बू सोबत द क्रू याबरोबरच टाइगर श्रॉफ स्टारर गणपथ अशा चित्रपटांचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षात कंगना रनौत, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि आलिया भट्ट यांनी अभिनयासोबतच चित्रपट निर्मितीचे देखील काम केले आहे.

आता क्रितीला यामध्ये कितपत यश मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आदिपुरुषनंतर क्रिती याबाबत घोषणा करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT