Lee Sang Eun Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Lee Sang Eun Passes Away : या जगप्रसिद्ध गायिकेचं निधन, वॉशरुममध्ये आढळला मृतदेह

Rahul sadolikar

संगीत क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरियन गायिका ली संग युन तिच्या परफॉर्मन्सच्या आधी वॉशरूममध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. तिचा मृत्यू घातपात असण्याचा पोलिसांचा संशय आहे. सविस्तर वृत्त चला पाहुया.

असं घडलं 'ली'चे करिअर

कोरियन सोप्रानो गायिका ली संग युन यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी नुकतेच निधन झाले. गिमचेऑन म्युनिसिपल कॉयरच्या 33 व्या नियमित मैफिलीत सादर होण्यापूर्वी ती एका वॉशरूममध्ये मृतावस्थेत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या तपास सुरू आहे.

ली संग युन हे कोरियन मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय गायकांपैकी एक आहेत. तिने सोल नॅशनल युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त केली आणि मास्टर्स डिग्रीसाठी न्यूयॉर्कमधील मॅनेस स्कूल ऑफ म्युझिकमध्ये गेली.

या ठिकाणी होणार होतं सादरीकरण

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार पोलीस तिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात असेही समोर आले की गुरुवारी कार्यक्रमाच्या कर्मचार्‍यांनी गायिका बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर रात्री 8:32 च्या सुमारास पोलिसांना बोलावले. 

तिचा मृतदेह मैफिलीच्या स्थळाच्या तिसर्‍या मजल्यावरील लेडीज टॉयलेटमध्ये सापडला. कारमिना बुराना ग्रँड हॉल ऑफ गिमचेऑन कल्चर अँड आर्ट सेंटर येथे जिथे ती इंग्लंड आणि होनम यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सादरीकरण करणार होती.

ती बाथरुममध्ये पडली होती !

“ली संग युनची स्टेजवर येण्याची वेळ जवळ आली होती, पण ती बॅकस्टेजला नव्हती. जेव्हा मी बाथरूममध्ये पाहिले तेव्हा मला ती जमिनीवर पडलेली दिसली,” कार्यक्रम स्थळाच्या रात्रपाळी कर्मचाऱ्याने ही माहिती दिली. 

गायिकेला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले जेथे तिला मृत घोषित करण्यात आल. दरम्यान, अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, पोलिसांना या प्रकरणात घातपात झाल्याचा संशय नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT