Bollywood actor Amitabh Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीमध्ये होणार बदल; अमिताभ बच्चन म्हणाले...

Amitabh Bachchan: हा बदल त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून सांगितला आहे.

दैनिक गोमन्तक

Amitabh Bachchan: गेल्या 23 वर्षापासून अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला कौन बनेगा करोडपती हा शो प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम म्हणून प्रसिद्ध झाला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नॉलेजसोबतच प्रेश्रकांचे भरपूर मनोरंजनदेखील होते.

आता कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचा एक प्रोमो रिलिज झाला असून बीग बी अमिताभ बच्चन हटके अंदाजात नव्या शोबद्दल सांगताना दिसत आहेत.

आपल्या जबरदस्त प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन कविता म्हणताना दिसत आहेत. या कवितेतून भारतात, आपल्या समाजात सातत्याने बदल होतो आणि तो बदल महत्वाचा असतो. हा बदल त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून सांगितला आहे. ज्याप्रमाणे सर्व बदलत आहे त्याप्रमाणे कौन बनेगा करोडपतीदेखील बदलेल असे अमिताभ बच्चन यांनी शेवटी म्हटले आहे.

दरम्यान, केबीसीच्या निर्मात्यांनी शो कधी ऑन एअर होणार याबद्दल कोणतीही माहीती दिली नाही. याबरोबरच प्राइज मनी किती असेल याबद्दलही कोणतेही वक्तव्य केले नाही. मात्र रिलिज झालेल्या प्रोमोवरुन शोमध्ये नक्की काहीतरी बदल होणार असल्याने चाहते केबीसीची उत्सुकतेने वाट बघत आहेत. केबीसीमध्ये नक्की काय बदल होणार आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Supreme Court: शिक्षा पूर्ण होऊनही 4.7 वर्षे अधिक तुरुंगात, सुप्रीम कोर्टाचा संताप; पीडिताला 25 लाखांची भरपाई देण्याचे सरकारला आदेश

Weekly Horoscope: नशिबाचा तारा उजळणार: 'या' 4 राशींना पैसा, यश आणि मान-सन्मान लाभणार

SUV खरेदीदारांसाठी खुशखबर! केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महिंद्रा, टाटा आणि टोयोटाच्या गाड्या तब्बल 3.5 लाखांनी स्वस्त

Sanguem Lottery Winner: गणपती बाप्पा पावला...! सांगे गणेश मंडळाच्या लॉटरीत होमगार्ड महिलेला जॅकपॉट; 2 BHK फ्लॅटसह 35 लाखांची लागली लॉटरी

Asia Cup 2025: सर्वांच्या नजरा सूर्या-बुमराहकडे, पण 'हे' 3 खेळाडूच ठरू शकतात खरे 'गेम चेंजर'; भविष्यवाणी ठरणार का खरी?

SCROLL FOR NEXT