अनुपम खेर ज्या जिवनात 36 वर्षापुर्वी आली प्रेमाची किरण Instagram/@anupampkher
मनोरंजन

अनुपम खेरच्या जिवनात 36 वर्षापुर्वी आली प्रेमाची किरण

अनुपम खेर हे मूळचे काश्मीरचे असून त्यांच्या लग्नाची कहाणी खूप रंजक आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर (Actor Anupam Kher) आणि किरण खेर (Kirron Kher) यांची गणना बी-टाउनमधील जोडप्यांशी (Couples) केली जाते. या दोघांमध्ये चांगली बॉंडिंग आहे. अनुपम खेर हे मूळचे काश्मीरचे असून त्यांच्या लग्नाची कहाणी खूप रंजक आहे. अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला आज 36 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्याने त्यांची लव्ह स्टोरी (Love Story) कशी सुरू झाली ते जाणून घेऊ. अनुपम खेर आणि किरण खेर हे आधिपासूनच एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात खूप चांगली मैत्री होती. कोलकतामधील एका नाटकात ते एकत्रित काम करत असतांना तेथे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर 1985 मध्ये त्यांनी लग्न केले. याआधी या दोघांची भेट चंदीगडमध्ये झाली, येथे ते दोघेही थेटरमध्ये काम करत होते.

ते दोघे खूप चांगले मित्र

किरण खेर या 1980 मध्ये चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मुंबईत आल्या. त्यावेळी त्या बिझनेस मॅन गौतम बेरीच्या प्रेमात पडल्या. पुढे या दोघांचे लग्न देखील झाले. या दोघांना सिकंदर नावाच्या मुलाला देखील आहे. परंतु तरीही किरण या गौतमसोबत खुश नव्हत्या. त्यांना या नात्यातून बाहेर पडायचे होते. तसेच अनुपम खेरसुद्धा त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी नव्हते. एका नाटकासाठी त्या दोघांची कोलकातामध्ये भेट झाली. त्यानंतर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. किरण खेर म्हणाल्या," अनुपम तेव्हा थोडे वेगळे दिसत होते. एका चित्रपटासाठी त्यांनी आपले मुंडन केले होते.

अनुपम यांनीच प्रथम आपल्या मनातील गोष्ट किरण यांना सांगितली. एक दिवस अनुपम किरणच्या घरी आले आणि त्यांना म्हणाले, "मला वाटते की मी तुझ्या प्रेमात पडलो आहे." तेव्हाच.. इतक्या वर्षाच्या या मैत्रीमध्ये कुठेतरी प्रेम आहे हे किरण यांना देखील जाणवले. त्यानंतर हे दोघेही आपल्या आधीच्या संसारातून मुक्त झाले. यानंतर दोघांनी 1985 मध्ये लग्न केले. अनुपम यांनी किरणच्या पाहिल्या मुलाला आपले नाव दिले. हि गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे. सिकंदर हा अनुपम यांचा मुलगा नाही. किरण आणि अनुपम यांना मुल नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT