Shah Rukh Khan Insta/Shahrukh
मनोरंजन

Shah Rukh Khan Video: शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना दिली 'ईदी'

शाहरुख खान दरवर्षी ईदच्या निमित्ताने घराबाहेर पडतो आणि चाहत्यांना शुभेच्छा देतो.

दैनिक गोमन्तक

Shah Rukh Khan Eid Wishes: बॉलिवूडचा किंग खान प्रत्येक वेळी ईदच्या निमित्ताने चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करतो. शाहरुख खान दरवर्षी ईदच्या निमित्ताने घराबाहेर पडतो आणि चाहत्यांना शुभेच्छा देतो. शाहरुखने त्याची दरवर्षीची ही प्रथा यावर्षीही पूर्ण केली. बकरीदच्या निमित्ताने शाहरुख लहान मुलगा अबरामसोबत बाल्कनीत आला आणि चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. शाहरुखचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ईदच्या निमित्ताने शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहते त्याच्या घराबाहेर जमतात. यंदाही मन्नतच्या बाहेर चाहते जमले आणि शाहरुखने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. चाहत्यांनी आपल्या आवडत्या सुपरस्टारला दुरूनच ईदच्या शुभेच्छा दिल्या.

अबरामने दिला वडिलांना आधार

शाहरुख चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर आला तेव्हा त्याचा धाकटा मुलगा अबरामही त्याच्यासोबत होता. यादरम्यान शाहरुख कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने पांढऱ्या टी-शर्टसोबत निळी कार्गो पॅन्ट घातली होती. त्याचवेळी अबराम लाल टी-शर्टसह डेनिममध्ये दिसला. अबरामनेही शाहरुखसोबत चाहत्यांना हाय-फाय केले.शाहरुख आणि अबरामचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

शाहरुख खान बर्‍याच दिवसांनी अभिनयाच्या दुनियेत परतणार आहे. तो 'पठाण'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुखकडे सध्या चित्रपटांची लाइन लागली आहे. 'पठाण'नंतर तो 'डंकी' आणि 'जवान'मध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT