Bhool Bhulaiyaa 2 Dainik Gomantak
मनोरंजन

विद्या बालनच्या 'मंजुलिकाची' जबाबदारी उचलताना...: कियारा अडवाणी

रुपेरी पडद्यावर भूल भुलैया 2 ची जादू पाहण्यासाठी चाहते आता सज्ज झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

रुपेरी पडद्यावर भूल भुलैया 2 (Bhool Bhulaiyaa 2) ची जादू पाहण्यासाठी चाहते आता सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट आपल्याला एका नॉस्टॅल्जिक प्रवासात घेऊन जात आहे. अक्षय कुमारचा पहिला 'भूल भुलैया' ज्याचा रिमेक टायटल ट्रॅक असो किंवा ट्रेलरमध्ये मंजुलिकाची उपस्थिती असो, ज्या लोकांनी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि विद्या बालन (Vidya Balan) स्टारर सिनेमा पाहिला आहे त्यांना खूप साम्य आढळून येईल. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना कियारा अडवाणीने स्पष्ट केले की ती कोणाच्याही पायात पाऊल टाकत नाहीये मी खुप क्लियर आहे. (Kiara Advanis revelation from Bhool Bhulaiyaa 2)

मिड डेशी बोलताना कियारा अडवाणीने खुलासा केला की, भूल भुलैया 2 ला हो म्हणणे तिच्यासाठी खुप सोपे होते. भलेही तिला हॉरर चित्रपटांचा तिटकारा होता, तरीही तिला अक्षय कुमारचा चित्रपट आवडला. भूल भुलैया 2 बद्दल बोलताना ती म्हणाली की त्यांनी मूळचे सार आणि मंजुलिकाच्या नावासारखे काही घटक टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पुढे ती म्हणाली की कथानक म्हणून हे पूर्णपणे नवीनच आहे. “हा सायकॉलॉजिकल थ्रिलर नसून एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. काळ्या जादूचा एक थर आहे,” असंही कियारा म्हणाली.

2007 च्या हिट चित्रपटात विद्या बालनला मंजुलिका म्हणून उत्कृष्ट काम करताना आपण सर्वांनी पाहिलं. मग कियारा अडवाणीला जेव्हा विचारण्यात आले की, तिने लगाम हाती घेतल्याने तिला दबाव जाणवला का? अभिनेत्रीने खुलासा केला की ती व्यक्तिरेखा साकारत नाही आणि हा रिमेक नाही म्हणून ती कोणाच्याही पायात पाऊल ठेवत नाहीये. ती पुढे म्हणाली की, "मला हा चित्रपट करायचा होता कारण अशा शैलीला कौटुंबिक मनोरंजनात रूपांतरित देखील केले जाऊ शकते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT