Kapil Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

Kapil Sharma Show : "पैसे नाहीत म्हणुन कुणाचं शिक्षण थांबु नये" कपिल शर्मा शो मध्ये खान सर भावुक..

आज रात्री कपील शर्मा शो हसवण्यासोबत तुम्हाला थोडं भावुकही बनवणार आहे.

Rahul sadolikar

The kapil Sharma Show : कपील शर्मा शो भारतातला सगळ्यात पॉप्युलर नॉन फिक्शन शो आहे. या चित्रपटात मोठमोठे कलाकार आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करायला येत असतात. मोठमोठ्या बॅनरचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शो ला हजेरी लावत असतात.

यावेळी कपिल शर्माच्या शो मध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लखनीय काम करणाऱ्या खान सरांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यावेळी ते शिकताना मुलांना काय संघर्ष करावा लागतो याबद्दल सांगत होते. नेहमी खळखळुन हसणारा आणि हसवणारा कपील शर्मासुद्धा खान सरांचे किस्से ऐकुन भावुक झाला.

7 जानेवारीला हा एपिसोड प्रसारित होणार असला तरी त्याची एक झलक सोनी चॅनलने फेसबुकवर शेअर केलेल्या एका व्हिडीओतुन दिली आहे.

या एपिसोडमध्ये आपल्याला मोटिवेशनल स्पीकर्स गौर गोपाल दास, विवेक बिंद्रा, गायक अल्ताफ राजा, श्वेता शेट्टी, शब्बीर कुमार आणि सुनीता राव हेही दिसतील.

खान सर सोशल मिडीयावर प्रचंड फेमस आहेत. ते मुलांकडुन UPSC ची तयारी करुन घेतात.गरीब विद्यार्थ्यांबद्दलची त्यांची तळमळ नेहमीच व्यक्त होत असते.

UPSCची फी अडीच लाख रुपये आहे ;पण खान सर साडेसात हजार रुपयांत मुलांना शिकवतात. एवढी कमी फीसुद्धा देणं काही विद्यार्थांना शक्य होत नाही. असं सांगत खान सरांनी दोन किस्से सांगितले.

खान सर म्हणाले, "एक मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली मला सकाळची बॅच द्या त्यावर मी म्हणालो मला प्रत्येकाच्या सोयीने बॅच नाही चेंज करता येणार.

तुला काय प्रॉब्लेम आहे त्यावर ती म्हणाली मला दिवसभर लोकांच्या घरी भांडी घासायला जावं लागतं" हा किस्सा ऐकुन कपिल शर्मासह अर्चना पूरण सिंहला धक्का बसला.

दुसरा एक किस्सा खान सरांनी त्या मुलाचा सांगितला जो दिवसभर नदीत वाळु भरायचं काम करायचा आणि त्यातुन आलेल्या पैशातुन तो फी भरायचा, ही फी घेताना माझे हात कापत होते असं सांगत खान सर भावुक झाले. खान सर म्हणाले पैसे नाहीत म्हणुन मी कधी कुणाचं शिक्षण थांबु देणार नाही.

आज रात्री कपील शर्माचा शो हसवणार तर नक्की पण रडवणारही तेवढाच आहे. कारण आज या शोमध्ये खुप जणांचे संघर्ष उलगडणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

SCROLL FOR NEXT