Jackie Shroff & Amitabh Bachchan & Sunil Shetty Dainiki Gomantak
मनोरंजन

KBC 13: अमिताभ बच्चन यांची तुलना 'या' अभिनेत्याने थेट देवाशी केली; पाहा व्हिडिओ

लहान असताना अमिताभ बच्चन यांना आपण पहिल्यांदा कसे भेटलो याचा खुलासा सुनिल शेट्टीने (Sunil Shetty) केला आहे.

दैनिक गोमन्तक

कौन बनेगा करोडपती 13 (KBC 13) मध्ये ग्रँड फ्रायडे निमित्त सुनील शेट्टी (Sunil Shetty) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) सेटवर आले होते. या प्रसंगी सुनील शेट्टीने खुलासा केला की, ''मी पहिल्यांदा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना चित्रपटाच्या सेटवर भेटलो होतो. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मला त्यांचा नंबर दिला आणि कॉल करण्यास सांगितले होते.'' लहान असताना अमिताभ बच्चन यांना आपण पहिल्यांदा कसे भेटलो याचा खुलासा सुनिल शेट्टीने केला आहे. त्यावेळी अमिताभ बच्चन मुंबईत सुनिल शेट्टीच्या घराजवळ शूटिंग करत होते.

सुनील शेट्टी पुढे म्हणाला, 'चित्रपटाशी संबंधित क्रू मला त्यांना भेटू देत नव्हते. आम्ही आठ ते दहा मुले होतो. आम्ही सर्व तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो, त्यावेळी तुम्ही मला तुमचा नंबर दिला होता. 'यावर अमिताभ बच्चन म्हणाले की, मी तुम्हाला माझा नंबर दिला मात्र तुम्ही त्यांनतर कॉल का केला नाही. यावर सुनील शेट्टी म्हणाला की,' सर तुम्हाला मी कॉल केला नाही, कारण देवाला कोणी कॉल करतो का?

अमिताभ बच्चन यांनीही एका आठवणीला उजाळा देताना म्हटले की, ''मी एकदा एका व्यक्तीला भेटलो तेव्हा त्याला मी सांगितले होते की, वेळ भेटला की मी तुम्हाला कॉल केला करेन. दोन-तीन दिवसांनी मी त्याला फोन केला तेव्हा त्या व्यक्तीने फोन घेण्यास नकार दिला. मी त्याला कॉल करत होतो तेव्हा त्याला वाटले की, कोणी त्याची चेष्टा करत आहे.''

जॅकी श्रॉफ म्हणाले की, जेव्हा अमिताभ बच्चन चेन्नईमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा मी त्यांना ऑटोग्राफ मागण्यासाठी गेलो होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT