Bhool Bhulaiyaa 2 Instagram
मनोरंजन

'भूल भुलैया'च्या भूतांमध्ये फसला कार्तिक आर्यन

'भूल भुलैया' चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मिडियावर पोस्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटातून (Movie) कार्तिक आर्यन, कियारा आणि तब्बूचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. प्रेक्षाकांना त्यांचा लुक खूप आवडला आहे. अलीकडेच कार्तिकने चित्रपटाचे आणखी एक पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले आहे. (Bhool Bhulaiyaa 2 latest News)

कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक 'भूल भुलैया 2' या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये कार्तिक 5 भूतांच्या मते बसलेला दिसत आहे. त्याने फोटो खाली लिहिले की"मिलीये मेरी साहिलियो से" आणि भुताचा इमोजी दिला आहे.

याआधी कियारा अडवाणीने (Kiara Advani) या चित्रपटामधील आपली एक झलक दाखवणार व्हिडिओ शेअर केला आहे. तिने लिहिले आहे की या चित्रपटामध्ये ती रीतची भूमिका साकारणार आहे. या पोस्टवरून असे दिसते की, चित्रपटात कियाराच्या आत भूत किंवा आत्म्याची छाया असेल.

तसेच तब्बूने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मोशन पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये तब्बू (Tabu) खूप घाबरलेली दिसत आहे. तब्बूच्या मागे एक आरसा आहे, ज्यामध्ये डायनचे केसही दिसत आहेत. तब्बूचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना आवडला आहे. प्रेक्षकांमध्ये 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) पाहण्यासाठी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

* यात काय विशेष असेल

चित्रपटाबद्दल बोलताना अनीसने पिंकविलाला सांगितले की हा चित्रपट त्याच्यासाठी खास आहे कारण हा त्यांचा पहिला हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पहिला 'भुल भुलैया' हा कॉमेडी असलेला सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट होता. ही एक हॉरर कॉमेडी आहे. लोकांना पहिल्या भागाची आठवण करून द्यावी, पण त्याचवेळी वेगळा अनुभव द्यावा, हे आव्हान आहे. चित्रपटात कार्तिक, कियाराशिवाय राजपाल यादव आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT