Kartik Aaryan Dainik GomanTAK
मनोरंजन

Kartik Aaryan: मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री; कार्तिक आर्यनचा व्हिडिओ शेअर करत खुलासा

Kartik Aaryan: आता कार्तिक आर्यनने त्याच्या आगामी चित्रपटाबाबत काही सोशल मिडियावर अपडेट्स शेअर केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Kartik Aaryan: काही चित्रपट हे वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करतात. कधी चित्रपटाच्या कथानकामुळे, कधी प्रेक्षकांच्या अभिनयामुळे कधी गाण्यांमुळे तर कधी दिग्दर्शमुळे काही चित्रपट वेगळे ठरतात. 'भूल भुलैया' हा चित्रपट त्यापैकी एक आहे.

2007 मध्ये रिलीज झालेला अक्षय कुमारचा 'भूल भुलैया' चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर 2022 मध्ये 'भूल भुलैया 2' आला होता, ज्यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता. लोकांनाही हा चित्रपट खूप आवडला आणि गेल्या काही दिवसांपासून चित्रपत्राच्या तिसऱ्या भागाची खूप चर्चा होत आहे.

आता कार्तिक आर्यनने त्याच्या आगामी चित्रपटाबाबत काही सोशल मिडियावर अपडेट्स शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटात 'मंजुलिका'ची भूमिका कोण साकारणार आहे हे सांगितले असून हा चित्रपट कधी रिलीज होणार याचादेखील खुलासा केला आहे. कार्तिकने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो 'भूल भुलैया' ची व्हिडिओ क्लिप आहे, ज्यामध्ये मंजुलिकाच्या भूमिकेत विद्या बालन तिच्या जोडीदारासोबत 'मेरे ढोलना' गाण्यावर नाचताना दिसत आहे.

यासोबतच या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यनही दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कार्तिकने लिहिले आहे की, 'मंजुलिका भूल भुलैयाच्या दुनियेत परतत आहे, विद्या बालनचे स्वागत करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.'

यासोबतच त्याने असेही लिहिले आहे की, 'भूल भुलैया 3' या दिवाळीत रिलिज होणार आहे. 2007 मध्ये आलेल्या 'भूल भुलैया' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत मंजुलिकाच्या भूमिकेत विद्या बालनने कमाल केली होती. मंजुलिकाच्या पात्राने लोकांना चांगलेच घाबरवले होते. महत्वाचे या भूमिकेमुळे विद्या बालनच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले होते.

यानंतर 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटात तब्बू आणि कियारा अडवाणी दिसल्या होत्या आणि चित्रपटातील पात्रांपासूनच त्याची कथाही लोकांच्या हृदयाला भिडली होती. या चित्रपटात कार्तिक आर्यनने रूह बाबा या भूमिकेतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. आता पुन्हा एकदा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरणार का आणि प्रेक्षकांना हा चित्रपट आवडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT