Laal Singh Chaddha Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Laal Singh Chaddha Trailer: करिना कपुरने भावनिक पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा

Kareena Kapoor: 'लाल सिंह चड्ढा' चा ट्रेलर रिलीज करताना करीना कपूर खानने केला आपल्या मुलाबद्दल एक खुलासा

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच तिच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातून अनेक वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. करीनाच्या पुनरागमनाबद्दल (Kareena Kapoor) तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. पण चाहत्यांपेक्षाही करिना या चित्रपटासाठी अधिक उत्सुक आहे, कारण हा चित्रपट तिच्या मातृत्व आणि धाकटा मुलगा जहांगीर अली खानशी संबंधित आहे. (Laal Singh Chaddha Trailer Out News)

आमिर खान स्टारर 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. करीना कपूरने तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर 28 मे 2022 रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाऊटवर (Instagram) रिलीज केला. ट्रेलरमध्ये करीनाचे पात्र आतापासून लोकांना आवडत आहे. करिनाच्या इंस्टाग्रामवर आतापर्यंत 1 मिलियन लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

करीना कपूर खानने ट्रेलर रिलीज करताना एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, जी तिच्यासाठी हा चित्रपट किती महत्त्वाचा आहे हे सांगते,तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "एक महामारी, दोन लॉकडाउन आणि एक बाळ नंतर... माझ्या सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक.. कारण माझा जे बाबा (मुलगा जहांगीर) देखील या चित्रपटाचा एक भाग आहे . अद्वैत (दिग्दर्शक) आणि आमिर खान यांचे आभार, ज्यांनी केवळ मलाच नाही तर आम्हा दोघांना यात सहभागी करून घेतले. ही अशी गोष्ट आहे जी मला नेहमीच आवडेल.”

करीना कपूर लाल सिंह चड्ढा'च्या शूटिंगदरम्यान गरोदर होती. आमिर खान आणि करीना कपूर स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यसह अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT