KGF 2 Dainik Gomantak
मनोरंजन

'KGF Chapter 2'चा ट्रेलर मार्च अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला

14 एप्रिल रोजी 'KGF 2' थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Akash Umesh Khandke

चार वर्षांपूर्वी 2018 मध्ये रिलीज झालेला 'KGF Chapter 1' हा कन्नड चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या कथेसोबतच अभिनेता यशची अ‍ॅक्शन आणि अभिनयाची प्रेक्षकांनी प्रशंसा केली होती. यानंतर प्रेक्षक 'KGF Chapter 2' ची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. चॅप्टर 2 मध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे कारण यावेळी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील चित्रपटात झळकणार आहे.

'KGF Chapter 2' ट्रेलर आणि चित्रपटाच्या रिलीजची तारीख
चित्रपट निर्मात्यांनी 27 मार्च रोजी 'KGF Chapter 2' चा ट्रेलर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. पुढे 14 एप्रिल रोजी 'KGF 2' थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कन्नड भाषेत बनलेला हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये डब करण्यात आला आहे.

KGF 2 चा ट्रेलर लॉन्च करण जोहर होस्ट करणार
निर्मात्यांनी अशी माहिती दिली आहे की, करण जोहर 'KGF Chapter 2' च्या भव्य लाँचचे सूत्र संचालन करणार आहे. चित्रपट (Movie) निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले – जेव्हा करण 'KGF Chapter 2' च्या मोस्ट अवेटेड ट्रेलर लॉन्च इव्हेंटचे होस्ट म्हणून सूत्र हाती घेतील तेव्हा भारतीय फिल्म इंडस्ट्री सर्वात मोठ्या उलथापालथीचा साक्षीदार होईल.

'KGF Chapter 2' या चित्रपटात अभिनेता यश आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन देखील राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT