Kangana Ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

Kangana Ranauat: …म्हणून माझे लग्न होत नाही! कंगनाचा धक्कादायक खुलासा

Kangana Ranauat: मला तर लग्न करायचे आहे मात्र काही लोक अफवा पसरवतात म्हणून माझे लग्न होत नाही.

दैनिक गोमन्तक

Kangana Ranauat: बॉलीवूडची क्वीन कंगणा रनौत सध्या 'टीकू वेड्स शेरु' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच तिने 23 जूनला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमॅझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार असल्याची अनाऊंसमेंट केली होती. आता कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे ती पून्हा चर्चेत आली आहे.

टीकू वेड्स शेरु च्या प्रमोशनदरम्यान तिच्या लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आपल्या हटके अंदाजात उत्तर दिले आहे. कंगना म्हणते- प्रत्येक गोष्टींची एक वेळ असते आणि ती गोष्ट त्या वेळेतच होईल. मलाही माझे कुटुंब हवे आहे.

मला ,स्वत:चे बाळही हवे आहे. हे सगळे एका विशिष्ठ वेळेतच होईल असे कंगनाने म्हटले आहे. याआधी एका मुलाखतीदरम्यान तिने म्हटले होते मला तर लग्न करायचे आहे मात्र काही लोक अफवा पसरवतात म्हणून माझे लग्न होत नाही.

टीकू वेड्स शेरु' ही अशी कॉमेडी-ड्रामा फिल्म आहे, जी वास्तविक जीवनातील संघर्ष समोर आणते. टीकू आणि शेरु हे एकमेकांपेक्षा अगदी विरुद्ध असूनदेखील त्यांचे स्वप्न एकच आहे. अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

आता कंगनाने प्रोड्यूस केलेला तिचा पहिला चित्रपट प्रेक्षकांवर भूरळ घालण्यात यश मिळवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT