Kangana Ranaut dainikgomantak
मनोरंजन

कंगनाने पुन्हा काढला ऋतिकवर राग ! म्हणाली - 6 बोटं वाला...

कंगनाने पुन्हा काढला ऋतिकवर राग काढला.... म्हणाली त्याला भीती वाटते

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. कंगना आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) याच्यांतील वाद जगजाहीर आहे. कंगना अनेकदा हृतिक रोशनवर तोंडसुख घेताना दिसते. आता पुन्हा एकदा कंगनाने आपला राग ऋतिक रोशनवर काढत आपल्या 'लॉक अप' शोमध्ये त्याच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यात हृतिक रोशनचे नाव न घेता 6 बोटं वाला असं म्हटलं आहे.

(Kangana says a guy with six fingers is worried from her show)

कंगनाचा शो 'लॉक अप' (Lock Upp) हा 27 फेब्रुवारीपासून OTT प्लॅटफॉर्म Alt Balaji आणि MX Player वर सुरू झाला आहे. यादरम्यान, कंगनाने (Kangana Ranaut) सांगितले की, तिच्या शोमध्ये बऱ्याच लोकांचा पितळ उघड होण्याच्या भितीने घाबरत आहेत. तसेच काही लोकांनी 5 वर्षे तिच्याकडे दुर्लक्ष केलं पण आता ते बोलू लागले आहेत. त्यानंतर ती असं काही बोलली की, ज्यामुळे सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं आहे.

यावेळी कंगना (Kangana Ranaut) म्हणाली की, लोक पाच बोटे जोडून हात जोडत आहेत. आणि 6 बोटं असलेल्या व्यक्तीचाही घसा आता कोरडा होत आहे. कंगना नेमकी कोणत्या 6 बोटं असलेल्या व्यक्तीबद्दल बोलत होती हे सर्वांना माहित आहे. 'हृतिक रोशनलाही (Hrithik Roshan) 6 बोटं आहेत. यादरम्यान, नाव न घेता कंगनाने सांगितले की, तिच्या शोमुळे हृतिक रोशन घावरला आहे. त्याला भीती वाटते की, सत्य उघडकीस येईल. मात्र, याआधीही कंगना राणौतने हृतिक रोशनवर अनेकदा निशाणा साधला आहे.

हे ही दिसतील कंगनाच्या शोमध्ये

कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) 'लॉक अप' शोबद्दल बोलायचे तर, आतापर्यंत 12 स्पर्धकांची नावे समोर आली आहेत, ज्यात बबिता फोगट, पूनम पांडे, निशा रावल, मुनव्वर फारुकी, करणवीर बोहरा आणि इतर वादग्रस्त सेलिब्रिटींचा समावेश आहे. हे स्पर्धक शोमध्ये 10 आठवडे कंगनाचे कैदी असतील आणि सर्व मूलभूत गरजांसाठी एकमेकांशी भांडताना दिसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT