Emergency Teaser Video| kangana ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

Kangana Ranaut Upcoming Film Emergency: कंगना लावणार इमर्जन्सी; टीझर रिलीज

Kangana Ranaut: कंगना तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Kangana Ranaut: बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत ही चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या टीकू वेड्स शेरु या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कंगनाने प्रोड्यूस केलेला हा पहिला चित्रपट आहे. आता मात्र टीकू वेड्स शेरु मुळे नाही तर कंगनाचा बहुचर्चित चित्रपट इमर्जन्सी मुळे चर्चेत आहे.

कंगनाचा बहुप्रतिक्षित चित्रपट इमर्जन्सी पहिला प्रोमो आता रिलिज झाला आहे. कंगनाने सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत चित्रपट कधी रिलिज होणार हे सांगितले आहे. भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित हा चित्रपट असून कंगना तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

24 नोव्हेंबर 2023 ला हा चित्रपट रिलिज होणार असल्याची कंगनाने घोषणा केली आहे. 1975 साली जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली होती, त्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवात आणीबाणी घोषित केलेल्या दिवसापासून होते. अनुपम खेर यांनी व्हाइसओव्हर केले असून ते या चित्रपटात जे पी नारायण यांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत.

या चित्रपटाची घोषणा 2021 मध्ये केला होती. याचे लेखन रितेश शाह यांनी केले आहे.

'मुझे इस देश की रक्षा करने से कोई नही रोख सकता क्योंकि इंडिया इज इंदिरा और इंदिरा इज इंडिया' हा कंगनाचा डायलॉग सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात कंगनाशिवाय अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, दिवंगत सतीश कौशिक आणि श्रेयस तळपदे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दरम्यान, तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित कंगनाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करतना दिसून येत आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT