Kamal Rashid Kumar Twitter
मनोरंजन

Kamal Rashid Kumar: अभिनेता कमाल रशीद खानला वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल मुंबईत अटक

Kamal Rashid Kumar Arrested: 2020 मध्ये वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल कमाल रशीद खानला मालाड (KRK) पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडचा अभिनेता केआरकेला (Kamal Rashid Kumar) वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आपल्या परखड प्रतिक्रियांसाठी ओळखला जाणारा कमाल राशिद खानच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केआरकेला मुंबई (Mumbai) विमानतळावर अटक करण्यात आली. आज त्याला बोरिवली कोर्टात हजर केले जाणार आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

केआरके हा सोशल मीडियावर त्याच्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या राधे चित्रपटावर त्यानं केलेला रिव्ह्यु सलमानला चांगलाच झोंबला होता.

त्यानंतर त्यानं कमालच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. बदनामी केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सलमानकडून करण्यात आली होती. सलमानच्या आक्रमकतेपुढे कमाल खानने नमतं घेतले होते.

कमालने आमिर खानच्या (Amir Khan) लाल सिंग चढ्ढाचा जो रिव्ह्यु केला त्याला देखील त्याच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र त्यावरुन अनेक बॉलिवुड सेलिब्रेटींनी नाराजी व्यक्त केली होती. कमाल नेहमीच बॉलिवूडमधील वेगवेगळ्या गोष्टींबद्दल परखडपणे वक्तव्य करत असतो. बॉलीवूमधील नेपोटिझमविषयी त्यानं केलेलं वक्तव्य बराच काळ चर्चेत होते. आता त्याला अटक झाल्यानंतर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT