मनोरंजन

'शाहरुखवर चढले देशभक्तीचे भूत' 'पठाण'च्या टीझरवर KRKने केले भाकीत

9 वर्षांपासून हे शाहरुख खानचे भक्त असेच सांगत आहेत आणि शाहरुख खान एकामागून एक संकट आणत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान (SHAHRUKH-KHAN) 'पठाण' चित्रपटातून बऱ्याच दिवसांनी पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाचा टीझर 2 मार्च रोजी लाँच करण्यात आला होता, जो इंटरनेटवर जोरदार गाजला आहे. शाहरुखला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांच्या आनंद गगनात मावेना झालाय. दरम्यान, कमाल आर खानने (KRK) शाहरुखचा चित्रपट 'पठाण' (Pathaan) रिलीज होण्यापूर्वीच आपत्तीजनक म्हणून घोषित केला आहे.

'शाहरुखवर चढले देशभक्तीचे भूत'

केआरकेने शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाबाबत ट्विट केले आहे, ज्यात त्याने लिहिले आहे की, 'आता अक्कीच्या देशभक्तीचे भूत एसआरकेवरही चढले आहे, त्यामुळे आता तो देश वाचवणार आहे.जर शाहरुखला देश वाचवायचा असेल तर त्याने थेएटरमध्ये खोटे ज्ञान देण्याऐवजी सीमेवर जाऊन चिनी सैन्याशी लढावे.'

चित्रपटाबाबत हे भाकीत केले

केआरकेच्या या ट्विटला उत्तर देताना शाहरुखच्या एका चाहत्याने लिहिले की, 'तू खूप नकारात्मक व्यक्ती आहेस. पठाण रिलीज झाल्यावर तुझा रिव्ह्यू नकारात्मक असेल पण हा चित्रपट 300 कोटींचा व्यवसाय करेल. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडेल, त्यासाठी थोडी प्रतिक्षा कर.' याला प्रत्युत्तर म्हणून केआरकेने आणखी एक ट्विट केले, 'गेल्या 9 वर्षांपासून हे शाहरुख खानचे भक्त असेच सांगत आहेत आणि शाहरुख खान एकामागून एक संकट आणत आहे. यावेळीही काही वेगळे होणार नाही. 'पठाण' हा आणखी एक डब्बा होण्याच्या ट्रॅकवर आहे.'

'पठाण' पुढच्या वर्षी याच दिवशी रिलीज होणार

विशेष म्हणजे जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे, ज्याने यापूर्वी 'वॉर' आणि 'बँग-बँग' सारखे सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. 'पठाण'चा टीझर पाहून शाहरुख खान या चित्रपटात एजंटच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. शाहरुखचा हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT