KP Chaudhry Arrested Dainik Gomantak
मनोरंजन

KP Chaudhry Arrested : रजनीकांतच्या कबाली चित्रपटाचा निर्माता ड्रग्ज प्रकरणात अडकला...

कबाली या रजनीकांतच्या प्रसिद्ध चित्रपटाचा निर्माता केपी चौधरी ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे.

Rahul sadolikar

अभिनेते रजनीकांत यांचा कबाली नावाचा चित्रपट काही काळापूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. हा चित्रपट एका प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रजनीकांत यांच्या 'कबाली' या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते केपी चौधरी ड्रग्ज प्रकरणात अडकले आहेत.

हैदराबाद पोलिसांनी त्याच्याकडून अमली पदार्थ जप्त केले, आणि त्यांना अटक करण्यात केली.केपी चौधरी हे हैदराबादमधील राजेंद्रनगरजवळील किस्मतपूर येथील त्यांच्या घराकडे निघाले असताना त्यांना विशेष तपास पथकाने पकडले.

केपी चौधरीकडून कोकेन जप्त

वृत्तानुसार, केपी चौधरीकडून पोलिसांना कोकेनच्या 90 गोण्या सापडल्या, ज्यांचे वजन 82.75 ग्रॅम असल्याचे सांगण्यात आले. केपी चौधरीने गोव्यातून ड्रग्जच्या 100 गोण्या विकत आणल्याचा दावा केला जात आहे, मात्र पोलिसांनी 90 जप्त केल्या आहेत.

केपी आपल्या क्लायंटला ड्रग्ज पुरवण्यासाठी जात असताना पकडले गेले. या प्रकरणी केपी चौधरी यांची आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर तपास यंत्रणांकडून चौकशी केली जाणार आहे.

यापूर्वीही होता ड्रग्जचा आरोप

ड्रग्ज प्रकरणापूर्वीही केपी चौधरी वादात सापडले आहेत. एनआरआय चिगुरुपती जयराम यांच्या हत्येप्रकरणी केपी चौधरी यांचेही नाव पुढे आले आहे.

2016 मध्ये, केपीने चित्रपट उद्योगात प्रवेश केला आणि रजनीकांतचा सिनेमा कबालीच्या तेलुगु आवृत्तीची निर्मिती केली.

वितरक म्हणूनही काम

केपी चौधरी यांनी काही चित्रपटांमध्ये वितरक म्हणूनही काम केले. त्यापैकी एक सरदार गब्बर सिंग आणि दुसरा सीताम्मा वकितलो सिरिमल्ले चेट्टू. याशिवाय ते कन्नीटन या तमिळ चित्रपटाशीही जोडले गेले होते.

या चित्रपटांमधून त्यांना फारसा फायदा झाला नसला तरी. मीडिया रिपोर्ट्सनुसार केपी चौधरी यांचा गोव्यात क्लब आहे. चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक स्टार्स त्यांच्या क्लबला भेट देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

SCROLL FOR NEXT