K-pop star Moonbin Dainik gomantak
मनोरंजन

K-Pop Star Moon Bin Passes Away: मून बिनचे अवघ्या 25 व्या वर्षी निधन

K-pop star Moon bin: 2016 मध्ये त्याने बॉय बँड अॅस्ट्रोमध्ये समील झाला होता.

दैनिक गोमन्तक

K-pop star Moonbin: कोरियन पॉपस्टार मूनबीनचे अवघ्या 25व्या वर्षी निधन झाल्याची माहीती मिळाली आहे. दक्षिण कोरियाच्या पोलिसांनी म्हटले आहे की तो बुधवारी संध्याकाळी राजधानी सेऊलच्या गंगनम शेजारच्या त्याच्या अपार्टमेंटमध्ये प्रतिसाद देत नसल्याचे आढळले.

मूनबिनने अनपेक्षितपणे जग सोडले आणि आकाशातील एक तारा बनला असे लेबल फँटागिओने म्हटले आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. 2016 मध्ये त्याने बॉय बँड अॅस्ट्रोमध्ये समील झाला होता. त्याआधी त्याने मॉडेल म्हणून काम केले आहे.

बॉयबँडचे अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरुन मूनबिनचे म्युझिक लेबल फॅन्टाजिओ यांनी कोरियन भाषेत ही बातमी सर्वांना सांगीतली आहे. ही अत्यंत दुखाची बाब असून आपण मूनबीनला गमावले असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, के-पॉप गायक लहान वयातच फँटागिओच्या प्रशिक्षणार्थी कार्यक्रमात सामील झाला होता. फेब्रुवारी 2016 मध्ये अॅस्ट्रोसोबत पदार्पण करण्यापूर्वी तो एक अभिनेता आणि मॉडेल होता.

हा ग्रुप मूळतः सहा कलाकारांचा होता, परंतु फेब्रुवारी 2023 मध्ये एक सदस्य सोडून गेला. मूनबिनची बहीण मून सुआ ही एक के-पॉप गायिका आहे, ती बिली या मुलींच्या ग्रुपचा भाग म्हणून काम करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT