Jee Le Zaraa Dainik Gomantak
मनोरंजन

Jee Le Zaraa Movie: 'जी ले जरा'च्या चर्चांवर झोया अख्तरने सोडले मौन

Jee Le Zaraa: 'जी ले जरा' ची गोष्ट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटासारखीच असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमन्तक

Jee Le Zaraa: प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 'डॉन 3' आणि 'जी ले जरा' या हे चित्रपट या चर्चांचे कारण ठरले आहेत.

जी ले जरा चित्रपटाची कथा झोया अख्तर आणि रीमा कागतीने लिहिली आहे. सुरुवातीला या चित्रपटात इंडस्ट्रीतील तीन दिग्गज अभिनेत्री आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ यांना कास्ट केल्याचे म्हटले जात होते.

मात्र काही दिवसातच प्रियंका चोप्राने चित्रपटातून एक्झिट घेतल्याच्या चर्चांना उधान आले होते. प्रियंकापाठोपाठ कतरिनानेदेखील हा चित्रपट सोडल्याचे म्हटले जात होते.

आता झोया अख्तरने या चर्चांवर मौन सोडले असून लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल असे म्हटले आहे. मात्र प्रियंका आणि कतरिनाने चित्रपट सोडला कि नाही याबद्दल भाष्य केले नाही.

मिळालेल्या माहीतीनुसार, चित्रपटाचे चित्रीकरण लवकर सुरु होत नसल्याने या अभिनेत्रींनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, 'जी ले जरा' ची गोष्ट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटासारखीच असल्याचे म्हटले जात आहे. रोड ट्रीपवर आधारित हा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. आता या चित्रपटात नक्की कोण दिसणार आणि चित्रपटाच्या शूटिंगला कधी सुरुवात होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT