Jaya Bachchan Dainik
मनोरंजन

Jaya Bachchan: जया बच्चन यांना व्हायचं होतं रिअल लाइफ हिरो, सैन्यात भरती होण्याचं स्वप्न भंगल्याची खंत

Jaya Bachchan: मात्र आज परिस्थिती बदलली आहे. मुलींसाठी अनेक मार्ग खुले झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Jaya Bachchan: बच्चन कुटुंबिय हे नेहमीच चर्चेत राहणारे सेलेब्रिटी कुटुंब आहे. आता गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदाच्या पॉडकास्टमध्ये आई श्वेता नंदा आणि आज्जी जया बच्चन यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी अनेक गोष्टींबाबत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. यावेळी जया बच्चन यांना चित्रपटात नाही तर आर्मीमध्ये भरती व्हायचे होते अशाप्रकारचा खुलासा श्वेता आणि स्वत: जया बच्चन यांनी केला आहे.

जया बच्चन म्हणतात- मी जेव्हा शाळा-कॉलेजात होते तेव्हा पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे तशाचप्रकारच्या नोकरीच्यादेखील संधी असत. त्यावेळी आर्मीमध्ये जायचे होते मात्र तेव्हा तिथे महिलांसाठी फक्त नर्सचीच नोकरी होती. त्यामुळे मला आर्मीमध्ये जाता आले नाही म्हणून मी निराश झाले होते. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. मुलींसाठी अनेक मार्ग खुले झाले आहेत.

श्वेता बच्चन यावर बोलताना म्हणतात, 'जर एक पुरुष गाडीत बसला असेल आणि एक महिला गाडी चालवत असेल तर हे विचित्र होईल. आज तसे नाही आणि आपण खूप प्रगती केली आहे.

दरम्यान, या पॉडकास्ट दरम्यान जया बच्चन आणि श्वेता नंदा यांनी लग्न, प्रेम या संकल्पनाबद्दल देखील वक्तव्य केले आहे. नव्या नंदाचा हा पॉडकास्ट जेव्हापासून रिलिज झाला आहे तेव्हापासून चर्चांचा भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुंटुंबिय आपल्या संपत्तीमुळे देखील चर्चेत आहे. त्यांची एकूण संपत्ती 1,578 कोटी रुपए असल्याचे म्हटले जात आहे.

याबरोबरच, ऐश्वर्या राय ही आपल्या कुटुंबापासून वेगळी होणार असल्याच्या चर्चांनादेखील उधाण आले होते. या लोकप्रिय कुटुंबात भांडणे होत असल्याचे वारंवार म्हटले जात होते. जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यातील मतभेद आणि वाद हे कारण असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐश्वर्या किंवा इतर कोणत्याही बच्चन कुटुंबियातील कोणत्याही सदस्याकडून याबद्दल खुलासा केला नाही. याबरोबरच, ऐश्वर्याने अभिषेक बच्चन वाढदिवसादिवशी शुभेच्छा देत चर्चांना पूर्णविराम दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT