Throwback Video Dainik Gomantak
मनोरंजन

Throwback Video: .... जेव्हा जया बच्चन ऐश्वर्याला म्हणाल्या, तेव्हा बच्चन कुटुंबाच्या सुनेला अश्रू झाले अनावर,पाहा व्हिडिओ

ऐश्वर्या आणि जया बच्चनची जोडी बी-टाउनची सर्वात प्रसिद्ध सासू-सून-सून जोडी आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या कौटुंबिक गोष्टींसाठी ओळखली जाते. ऐश्वर्या रायचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या आणि तिची सासू जया बच्चन यांच्यातील सुंदर बाँडिंग पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) स्टेजवर सर्वांसमोर पुरस्कार स्वीकारताना जया बच्चन आपली सून ऐश्वर्याचे कौतुक करताना दिसत आहेत, तर पती अभिषेक बच्चनसोबत प्रेक्षकांमध्ये बसलेल्या ऐश्वर्याच्या डोळ्यात अश्रू आलेले दिसत आहे. व्हिडीओमध्ये जया बच्चन ऐश्वर्याच्या संस्कारांचे आणि स्मित हास्याचे कौतुक करत आहेत.

ऐश्वर्या आणि जया बच्चन ही जोडी बी टाऊनची सर्वात प्रसिद्ध सासू-सून जोडी आहे. चाहत्यांना ही जोडी खूप आवडते. ऐश्वर्या जया बच्चनच्या खूप जवळ आहे आणि सोशल मीडियावर (Social Media) संपूर्ण कुटुंबासोबत सुंदर फोटो शेअर करत असते.

'ढाई अक्षर प्रेम के' दरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. यानंतर दोघेही 'गुरू' च्या वेळी प्रेमात पडले. 'गुरू' च्या प्रीमियरसाठी दोघे टोरंटोला पोहोचले तेव्हा अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केले. दोघांना एक मुलगी आहे जिचे नाव आराध्या आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT