Jaya Bachchan  DainiK gomantak
मनोरंजन

Jaya Bachchan : पामेला चोप्रा यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी आलेल्या जया बच्चन का चिडल्या?

नुकताच अभिनेत्री जया बच्चन यांच्या रागाचा पारा चढलेला सर्वांना पाहायला मिळाला आहे.

Rahul sadolikar

 आदित्य चोप्राची आई आणि चित्रपट निर्माते यश चोप्राची पत्नी पामेला चोप्रा यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी न्यूमोनियामुळे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने इंडस्ट्रीत मोठा धक्का बसला आणि अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. 

दिवंगत पामेला चोप्राच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी जया बच्चन आपली मुलगी श्वेता बच्चनसोबत आदित्य चोप्राच्या घरीही पोहोचल्या, मात्र यादरम्यान जया बच्चन पुन्हा संतापल्या.

जया बच्चन यांना किती राग येतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. ती जिथे जिथे पापाराझी पाहते तिथे ती भडकते. जयाजी शुक्रवारी मुलगी श्वेता नंदासोबत आदित्य चोप्राच्या घरी पोहोचल्या. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जया बच्चन मीडियाला त्यांचे फोटो क्लिक करणे थांबवण्याचे निर्देश देताना दिसत आहेत. 

एका व्हिडिओमध्ये जयाजी ‘मला स्पेस पाहिजे’ असे म्हणताना दिसत आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये जया बच्चन कॅमेरामनला फोटो क्लिक करण्यापासून थांबवताना दिसत होत्या. त्या रागाने म्हणाल्या, पुरे झाले आता, परत जा.

जया बच्चन यांनी पापाराझींशी ज्या प्रकारे संवाद साधला आणि त्यांना 'अशिष्ट' संबोधले त्यावर नेटिझन्स खूश नव्हते. एका कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, "मीडिया संपूर्ण बच्चन कुटुंबाचा आदर करत असतानाही ती नेहमी मीडियाशी असेच बोलत असते .

" आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले, "ती नेहमी रागावलेली असते." दुसर्‍या युजरने लिहिले, "तिची विनाकारण अशी वृत्ती का आहे?" काहींनी जया बच्चन यांचे समर्थन केले आणि म्हटले, "ती बरोबर आहे एखाद्याच्या अंत्यसंस्कारात फोटो का क्लिक करावा?.

वर्क फ्रंटवर, जया बच्चन पुढे करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेत्रीशिवाय रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत. 

या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि 28 जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटाचे संगीत प्रीतम चक्रवर्ती यांनी दिले असून शशांक खेतान, इशिता मोईत्रा आणि सुमीत रॉय यांनी लिहिले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT