Jaya Bachchan  DainiK gomantak
मनोरंजन

Jaya Bachchan: "अशा लोकांना कामावरुन काढुन टाकायला हवं"! जया बच्चन कुणावर संतापल्या?

सेलिब्रिटी कुणावर कधी चिडतील, कुणाची कुठली गोष्ट त्यांना खटकेल हे सांगणं खूप कठीण असतं

गोमन्तक डिजिटल टीम

बी टाऊनमध्ये कधी कुठली वादग्रस्त घटना घडेल हे सांगणं फार मुश्कील असतं. लोकांना जीव की प्राण असणारे त्यांचे सेलिब्रीटी कधी कधी मूडमध्ये नसतात किंवा त्यांना त्यांची स्पेस हवी असते. (Jaya Bachchan angry on paparazzi)

आता बिग बी आणि त्यांच्या लाडक्या पत्नी जया बच्चन यांचंच उदाहरण घ्या . त्यांच्या बाबतीत काय घडलं चला पाहुया.

मिळालेल्या माहितीनुसार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी त्यांचे फोटो क्लिक करणार्‍या लोकांवर संताप व्यक्त केला आणि "अशा लोकांना कामावरून काढले पाहिजे" असं म्हणुन त्यांनी राग व्यक्त केला.

अमिताभ बच्चन यांनी कशी प्रतिक्रिया दिली तेही या व्हिडीओतुन आपण पाहु शकतो. व्हिडिओ पहा.

चाहत्यांनी आणि पापाराझींनी त्यांंचे फोटो काढताना मर्यादा ओलांडल्यामुळे त्या चिडल्या अशा माहिती मिळाली आहे. पण नेमकं झालं काय? वारंवार फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केल्याने अभिनेत्री जया बच्चन संतप्त झाल्या. 

सारा, जया आणि त्यांचे पती-अभिनेते अमिताभ बच्चन इंदूरला गेले आणि विमानतळावर ही घटना घडली. इंस्टाग्रामवर मंगळवारी एका पापाराझी अकाउंटवरुन जया बच्चन अनेक लोकांशी बोलत असल्याची क्लिप पोस्ट केली गेली होती.

इंदुर विमानतळावर जया बच्चन लोकांशी बोलत असताना एक व्यक्ती त्याच्या फोनवर हे बोलणं रेकॉर्ड करताना दिसली. कॅमेरे घेऊन इतरही काही जण त्यांच्या आजूबाजूला दिसले. त्यांच्याशी बोलताना जया बच्चन यांनी त्या लोकांना समजावुन सांगितलं पण फोटो काढणं थांबलं नाही.

"कृपया माझे फोटो काढू नका.तुम्हाला इंग्लीश समजत नाही?" त्यानंतर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आणि त्यांच्या सिक्योरिटीने पापाराझींना फोटो घेताना अडवले आणि त्यांना मागे ढकलले. त्यांनी चाहत्यांना बाजूला सरकून कॅमेरा खाली ठेवण्यासही सांगितले.

त्याच क्षणी अमिताभ आत गेले आणि दोघांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. चालताना जया म्हणाली, "अशा लोकांना नोकरीवरून काढून टाकले पाहिजे." अमिताभने काही क्षण जयाकडे पाहिलं.

अमिताभ जमिनीकडे खाली बघत गेले त्याचवेळी जया बच्चन इतर लोकांसोबत निघून गेल्याने क्लिप संपली. प्रवासासाठी अमिताभ यांनी हुडी आणि काळी पँट घातली होती. जयाने प्रिंटेड सूट, क्रीम शॉल आणि शूज घातले होते.

सेलिब्रिटींनाही त्यांचं एक व्यक्तिगत आयुष्य असतं. त्याचा मान राखला गेला पाहिजे. त्यांच्या व्यक्तिगत कक्षेत जात आपण त्यांची प्रायव्हसी तर भंग करत नाही ना? हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा. झालेल्या या वादात जया बच्चन मात्र चांगल्याच भडकलेल्या दिसल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

SCROLL FOR NEXT