Janhvi Kapoor Video Dainik Gomantak
मनोरंजन

Janhvi Kapoor Visits Balaji Temple: जान्हवी कपूरने तिरुमला मंदिरात घातला दंडवत, पाहा व्हिडिओ

बॉलिवुडमधील प्रसिध्द अभिनेत्री जान्हवी कपूरने तिरुपती येथील तिरुमला बालाजी मंदिराला भेट दिली आहे.

Puja Bonkile

Janhvi Kapoor Visited Tirupati Balaji Temple: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर, तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये आपल्या ग्लॅमरस अदा दाखवणारी जान्हवी कपूर प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय धार्मिक आहे.

ती अनेक वेळा मंदिरात जाऊन दर्शन घेताना दिसते. जान्हवी नुकतीच आंध्र प्रदेशमधील तिरुमाला बालाजी मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. या वेळी अतिशय साध्या वेशात ती भक्तीत लीन झालेली दिसली.

जान्हवी कपूरने नुकतेच ज्युनियर एनटीआरसोबत एनटीआर 30 या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात ती एनटीआरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिचा दर्शन घेतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर पारंपारिक दक्षिण भारतीय ड्रेसमध्ये दिसत आहे.तिच्यासोबत तिची धाकटी बहीण खुशी कपूर देखील हजर होती. त्या दोघींनी तिरुपती बालाजी येथील तिरुमला मंदिरात हात जोडून प्रार्थना केली. यावेळी जान्हवी आणि खुशीसोबत काही जवळचे लोकही तिथे उपस्थित होते.

  • चित्रपटांसाठी या ब्रॅडने केले काम

याआधी ब्रॅड मिनिचने 'जस्टिस लीग' (2021), 'द गॉड लॉर्ड बर्ड' (2020), 'एक्वामन' (2018) 'बॅटमॅनसह अनेक ब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले आहे. सुपरमॅन' (2016). 'NTR 30' हा पहिला भारतीय चित्रपट (Movie) आहे ज्यासाठी ब्रॅड काम करत आहे. 

'NTR 30' या दिवशी होणार रिलीज
ज्युनियर NTR आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपट 'NTR 30' पुढील वर्षी 5 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. ज्युनियर NTR चा हा पहिला एकल पॅन इंडिया चित्रपट आहे.

हा चित्रपट तेलुगु, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ज्युनियर एनटीआरचा मागील चित्रपट RRR च्या 'नाटू नाटू' ला सर्वोत्कृष्ट गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय या गाण्याला गोल्डन ग्लोब्स पुरस्कार मिळाला होता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT