jammu kashmir story  Dainik Gomantak
मनोरंजन

जम्मू-काश्मीर पोलिसांनी रिलीज केली 'द अनटोल्ड काश्मीर

'द अनटोल्ड काश्मीर फाइल्स'मध्ये दहशतवादाच्या युगाचे चित्रण करणारी अनेक दृश्ये आहेत. फैज अहमद फैज यांची 'हम देखेंगे' ही कविताही ऐकायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

'द काश्मीर फाइल्स': 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या यशानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. दहशतवादामुळे सर्व काश्मिरींना मग ते कोणत्याही धर्माचे असोत, त्यांना त्रासाला सामोरे जावे लागल्याचे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. (Jammu and Kashmir Police released 'The Untold Kashmir')

हा व्हिडिओ 57 सेकंदांचा असून त्याला 'द अनटोल्ड काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) असे शीर्षक देण्यात आले आहे. या क्लिपमध्ये दहशतवादाच्या कालखंडाचे चित्रण करणारी अनेक दृश्ये आहेत. व्हिडीओच्या पार्श्वभूमीत फैज अहमद फैज यांची 'हम देखेंगे' ही कविता ऐकू येत आहे जी 'द काश्मीर फाइल्स'मध्येही वापरली गेली होती.

व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'दहशतवादी एसपीओ इश्फाक अहमद यांच्या घरात घुसले आणि त्यांचा भाऊ उमर जानसह त्यांची हत्या केली. शांततेचे समर्थन करणारे असे अनेक काश्मिरी मारले गेले. आणखी एका फ्रेममध्ये लिहिले आहे, “काश्मीरमध्ये (Kashmir) लक्ष्य करून 20 हजार लोक मारले गेले. आमच्यावर आवाज उठवण्याची वेळ आली आहे." व्हिडिओच्या शेवटी ‘आम्ही काश्मीर आहोत, आम्ही बघू’ असे म्हटले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Police) 31 मार्च रोजी ट्विटरवर हा व्हिडिओ जारी केला, जो आतापर्यंत 1.66 लाख लोकांनी पाहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

SCROLL FOR NEXT