Jacqueline Fernandez & Sukesh Chandrasekhar Dainik Gomantak
मनोरंजन

Jacqueline Fernandez: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची आज पुन्हा चौकशी

जॅकलिन फर्नांडिसची 14 सप्टेंबर रोजी सुमारे 8 तास चौकशी केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, या संबंधित प्रत्येक आरोपीची चौकशी केली जात आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) आज पुन्हा एकदा EOW (दिल्ली पोलिसांचे आर्थिक गुन्हे शाखा) शाखेत बोलावण्यात आले आहे. 14 सप्टेंबर रोजी त्यांची सुमारे 8 तास चौकशी केल्यानंतर जॅकलिनची आज पुन्हा चौकशी केली जात आहे.

जॅकलिन फर्नांडिस चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत पोहोचली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंधर्भात बातनी दिली आहे.

जॅकलिन फर्नांडिसची मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात ईडीने अनेकवेळा चौकशी केली आहे. आता आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. जॅकलिन फर्नांडिसने ईडीच्या चौकशीदरम्यान सुकेश चंद्रशेखरकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे कबूल केले आहे. त्याचबरोबर याप्रकरणी नोरा फतेहीचीही (Nora Fateh) चौकशी करण्यात आली. नोराने आपल्याला बीएमडब्ल्यू कारची ऑफर देण्यात आली होती परंतु तिने ती नाकारली अशी माहिती तिने दिली आहे.

तब्बल 200 कोटी रूपये खंडणीचा आरोप असलेला सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या तुरुंगात आहे. सुकेश चंद्रशेखर याच्यावर दहाहून अधिक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात जॅकलीन आणि नोरा फतेही व्यतिरिक्त इतर चार अभिनेत्रींचीही नावे नुकतीच समोर आली आहेत. निकिता तांबोळी, चाहत खन्ना, सोफिया सिंग आणि आरुषा पाटील यांनी सुकेश चंद्रशेखर यांची तुरुंगात भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT