Jacqueline Fernandez Instagram
मनोरंजन

Jacqueline Fernandezच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणात ईडीने ठरवले आरोपी

Jacqueline Fernandez: ईडीच्या वतीने पीएमएलए अंतर्गत दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

महाठग सुकेश चंद्रशेखरविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही आरोपी ठरण्यात आले आहे. सुकेशवर 200 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात जॅकलीनला आरोपी ठरण्यात आले आहे. या खंडणी प्रकरणात ईडी मनी ट्रेलचा तपास करत आहे.

यापूर्वी, ईडीने जॅकलिनची मालमत्ता जप्त केली होती आणि तिची चौकशीही केली होती. ईडीने एप्रिलमध्ये पीएमएलए अंतर्गत तिची 7 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

त्यानंतर ईडीने एका निवेदनात म्हटले होते की, "सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांमधून मिळालेल्या रकमेतून जॅकलिन फर्नांडिसला 5.71 कोटी रुपयांच्या अनेक भेटवस्तू दिल्या होत्या." चंद्रशेखरने या प्रकरणातील त्याची सहकारी आणि सहआरोपी पिंकी इराणीला पुरवण्यासाठी या भेटवस्तू ठेवले होते.

ईडीने (ED) आरोप केला आहे की भेटवस्तूंमध्ये 52 लाख रुपयांचा घोडा आणि 9 लाख रुपयांची पर्शियन मांजर आहे.यासोबतच चंद्रशेखर यांनी फर्नांडिस यांच्या कुटुंबीयांना मोठी रक्कम दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकांच्या कुटुंबाने फसवणूक केलेल्या 200 कोटी रुपयांपैकी चंद्रशेखर यांनी तिला 5.71 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा आरोप ईडीने केला आहे.

फर्नांडिस श्रीलंकन नागरिक आहे. तिने 2009 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या प्रकरणी ईडीने एकूण आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारिया पॉल यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT