Jackie shroff Dainik Gomantak
मनोरंजन

Jackie Shroff: राममंदिराच्या उद्घाटनानंतर जॅकी दादाच्या 'त्या' कृतीने जिंकलं चाहत्यांचे मन

Jackie Shroff: बॉलीवूडचे अनेक कलाकारदेखील या उत्सवासाठी उपस्थित राहिले होते.

दैनिक गोमन्तक

Jackie Shroff: 22 जानेवारीला आयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. या सोहळ्याला अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. बॉलीवूडचे अनेक कलाकारदेखील या उत्सवासाठी उपस्थित राहिले होते.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन व्यतिरिक्त, कतरिना कैफ, विकी कॅशल, आलिया भट्ट, रणबीर कपूर, रोहित शेट्टी, आयुष्मान खुराना यांसारख्या अनेक स्टार्सनी अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा मध्ये हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. जॅकी श्रॉफही विमानतळावर अनवाणी पायांनी रामाच्या मूर्तीसोबत रामनामाचा जयघोष करताना दिसला. त्याच्यासोबत विवेक ओबेरॉयदेखील होता.

विवेक ओबेरॉय आणि जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे विवेकने पापाराझींना सांगितले की जॅकी इथून पूर्ण अनवाणी गेला आणि तिथून अनवाणी परत आला. यानंतर दोघांनी हसत हसत मीडियासमोर ‘जय श्री राम’चा नारा दिला. त्याचवेळी अभिनेता मुंबईत पोहोचल्यावर जॅकी श्रॉफने आपल्या भावना व्यक्त केल्या. याआधी अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो मंदिराच्या पायऱ्या साफ करताना दिसला होता.

जॅकी श्रॉफच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो नुकताच नीना गुप्तासोबत 'मस्त में रहने का' मध्ये दिसला होता. तो अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला, याशिवाय तो रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, करीना कपूर खान आणि टायगर श्रॉफ दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT