Ishita Dutta  Dainik Gomantak
मनोरंजन

Ishita Dutta Baby: प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला मुलाला जन्म; लग्नाच्या 6 वर्षानंतर बनली आई

Ishita Dutta Baby: त्याचे फोटो स्वतः इशिताने शेअर केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Ishita Dutta Baby: 'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता आई झाली आहे. इशिताने मुलाला जन्म दिल्याची गुड न्यूज समोर आली आहे. या गुड न्यूजने केवळ इशिताचा पती अभिनेता वत्सल शेठच नाही तर तिचे कुटुंबीयही खूप खूश आहेत. तिच्या प्रेगन्सीच्या काळात इशिता सोशल मिडियावर खूप सक्रिय असल्याचे दिसून आले होते.

मिळालेल्या माहीतीनुसार, बाळाच्या आगमनाने तिचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. इशिताला 48 तास रुग्णालयात ठेवण्यात येईल, त्यानंतर तिला शुक्रवारी रुग्णालयातून सोडण्यात येईल. मात्र आत्तापर्यत याबद्दल इशिता किंवा वत्सल यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

इशिता दत्ताने तिच्या प्रेगन्सी दरम्यान तिचे बेबी बंप फ्लॉंट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच बंगाली रितीरिवाजांनुसार बेबी शॉवर केल्याचेही दिसून आले. त्याचे फोटो स्वतः इशिताने शेअर केले होते.

इशिता दत्ताचे 2017 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या 6 वर्षानंतर आता ही अभिनेत्री आई झाली आहे. मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात इशिता आणि वत्सल यांनी लग्नगाठ बांधली होती. हे दोन्ही स्टार्स 'रिश्तों का सौदागर: बाजीगर' या टीव्ही शोच्या सेटवर भेटले होते.

शूटिंग दरम्यानच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. इशिताने याआधी टिव्ही मालिकांमध्ये काम केले असून दृश्यम मधून तीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटात इशिताने अयज देवगणच्या मोठ्या मुलीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

दरम्यान, तिने दिलेल्या गुड न्यूज नंतर इशिता आणि वत्सलवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. आता इशिता आपल्या चिमुकल्याचा चेहरा कधी दाखवणार याची उत्सुकता याची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT