MS Dhoni Upcoming Movie Dainik Gomantak
मनोरंजन

MS Dhoni Upcoming Movie : कॅप्टन कूल धोनी दिसणार या चित्रपटात, माहीच्या पत्नीचं प्रॉडक्शन

भारताचा स्टार क्रिकेटर कॅप्टन कूल धोनी या एका चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.

Rahul sadolikar

भारताचा स्टार क्रिकेटर आणि चेन्नई सुपर किंगचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आता एका चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. चाहत्यांच्या लाडक्या महेंद्रसिंग धोनीने नुकतीच पत्नी साक्षीसोबत एका प्रॉडक्शन कंपनीची घोषणा केली. त्यांनी या प्रॉडक्शन हाऊसचे नाव 'धोनी एंटरटेनमेंट्स' असे ठेवले आहे. धोनीच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनलेला पहिला चित्रपट साऊथचा 'लेट्स गेट मॅरीड' (LGM) आहे. आता या चित्रपटातून एक जोरदार बातमी समोर येत आहे की धोनी यात कॅमिओ करताना दिसणार आहे. धोनीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.

माही अभिनय करणार

अलीकडील अहवालात असा दावा करण्यात आला आहे की क्रिकेटर-निर्माता एमएस धोनी 'लेट्स गेट मॅरीड' या तमिळ चित्रपटात खास भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे अभिनेतेही दिसणार चित्रपटात

रमेश थमिलमनी 'लेट्स गेट मॅरीड' दिग्दर्शित करत आहेत, हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. यात हरीश कल्याण आणि इवाना मुख्य भूमिकेत आहेत. तसेच साऊथचा लोकप्रिय अभिनेता योगी बाबू देखील या चित्रपटाचा एक भाग असणार आहे.

कौटुंबिक चित्रपट

LGM च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी, महेंद्रसिंग धोनीने चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की हा एक सुंदर कौटुंबिक चित्रपट आहे जो तो त्याच्या मुलीसोबत देखील पाहू शकतो. चित्रपटात सर्वच कलाकारांनी अप्रतिम काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT