Poonam Pandey In Lock Upp Dainik Gomantak
मनोरंजन

कंगनाच्या 'लॉक अप'मध्ये पूनम पांडेने ओलांडल्या मर्यादा, आता होत आहे टीका

एलिमिनेशनमधून वाचण्यासाठी चाहत्यांना दिलेले वचन पूर्ण केले

दैनिक गोमन्तक

Poonam Pandey In Lock Upp : अनेक वादग्रस्त सेलिब्रिटी कंगना रणौतच्या लॉक अप शोचा भाग बनले आहेत. शोमध्ये ते कधी भांडताना दिसतात तर कधी भावूक होऊन आपली गोष्ट सांगताना दिसतात. पूनम पांडेही कंगनाच्या शोचा एक भाग बनली आहे. शोमधील तिच्या वक्तव्यांमुळे पूनम नेहमीच चर्चेत असते. नुकतेच पूनमने एलिमिनेशन टाळण्यासाठी कॅमेऱ्यासमोर चाहत्यांना वचन दिले. निकालाच्या दिवशी कंगनाने सांगितले की, पूनमला सर्वाधिक मते मिळाली आहेत, जे ऐकल्यानंतर सर्वजण हैराण झाले. आता पूनम या आठवड्यात एलिमिनेशनमधून निसटली आहे, त्यामुळे तिने चाहत्यांना दिलेले वचन पूर्ण केले आहे.

शोमध्ये पूनम (Poonam Pandey) कॅमेऱ्यासमोर टॉपलेस झाली होती. निकालाच्या दिवशी, पूनम एलिमिनेशनमधून सुटली. ती आपले वचन पूर्ण करणार नाही, असे सर्वांना वाटत होते, पण तुरुंगात एकही कैदी नसताना तिने आपला टी-शर्ट काढला.

पूनम म्हणाली की मी माझे टॉपलेस होण्याचे वचन पाळले आहे आणि मी जास्त काही करू शकत नाही कारण हा शो सर्व वयोगटातील लोक पाहतात आणि मला असे काहीही करायचे नाही ज्यामुळे माझी आणि शोची प्रतिष्ठा खराब होईल.

मागच्या आठवड्यात ती नॉमिनेट झाल्यावर ती खूप नाराज झाली होती. त्यानंतर ती कॅमेऱ्यासमोर गेली आणि तिने तिच्या चाहत्यांना वाचवण्याची विनंती केली आणि वचन दिले की जर ती वाचली तर ती कॅमेऱ्यासमोर तिचा टी-शर्ट काढेल. तिने हे कृत्य केल्याने लोकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावेळचा तिचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT