Hrithik Roshan Instagram/@Hrithik Roshan
मनोरंजन

Vikram Vedha: हृतिक रोशनच्या 'या' मागणीने विक्रम वेधचे बजेट वाढले अनेक पटींनी

Hrithik Vikram Vedha: चाहते हृतिक रोशनच्या आगामी 'विक्रम वेधा' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन त्याच्या 'विक्रम वेध' या आगामी चित्रपटमुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक समोर आल्यापासून त्याचे चाहते त्याबद्दल खूप उत्सुक आहेत. पण यादरम्यान एक बातमी समोर आली आहे, ज्यानुसार हृतिकने मेकर्सचे टेन्शन वाढवण्याचे काम केले आहे. (Hrithik Vikram Vedha News)

* चित्रपटाचे बजेट अनेक पटींनी वाढले

हृतिक रोशनचा चित्रपट 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) हा त्याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे, ज्याचे दिग्दर्शन गायत्री आणि पुष्कर यांनी केले होते. त्याचबरोबर हे दोघेही हृतिकसोबत हा चित्रपट बनवत आहेत.

बॉलिवूड लाइफच्या एका खास बातमीनुसार, निर्माते तामिळप्रमाणे कमी बजेटमध्ये बनवण्याची तयारी करत होते. त्याचे यूपीमध्येच शुटिंग करायचे होते. मात्र, रिपोर्टनुसार हृतिक रोशन (Hrithik Roshan) तसे करण्यास तयार नाही. यूपीसारखाच सेट दुबईत बनवावा आणि त्याचं शुटिंग तिथेच व्हावं, अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे या चित्रपटाचे (Movie) बजेट खूप वाढले आहे. यासोबतच हृतिकच्या महागड्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचे नाव समाविष्ट झाले आहे.

* 175 कोटी रुपये बजेट

बॉलीवूड लाईफच्या या रिपोर्टनुसार हृतिक रोशनच्या या मागणीमुळे चित्रपटाचे बजेट आता 175 कोटी झाले आहे. तर तमिळ भाषेत हा चित्रपट केवळ 11 कोटींमध्ये बनला होता. मात्र, या वृत्ताबाबत अद्याप अधिकृतपणे माहिती समोर आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT