hrithik roshan saba azad Dainik Gomantak
मनोरंजन

Hrithik Roshan: हृतिक रोशनने गर्लफ्रेंडसोबत शेअर केलेल्या फोटोवर सुझानची कमेंट

Hrithik Roshan: हृतिक रोशन आणि सबा आझाद रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा

दैनिक गोमन्तक

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आजकाल अभिनेत्री आणि मॉडेल सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. खरं तर या दोघांनी आपलं नातं अजून जाहीर केलेलं नाही, असं असूनही दोघं अनेकदा एकत्र दिसतात. इतकंच नाही तर सोशल मीडियावर हे दोघही एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करत असतात. आजकाल फ्रान्समध्ये ही जोड सुट्ट्या एन्जॉय करत आहेत, त्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सबा आणि हृतिक (Hrithik Roshan) या दोघांनीही नुकतेच फ्रान्सच्या सुट्टीचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये दोघं एका क्लबमध्ये मस्ती करताना दिसत होते. सबाने हा फोटो शेअर करत लिहिले की, "जॅझ मांजर कुठे आहे ??." हृतिक आणि सबाने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेले फोटो लोकांना आवडत असून त्यावर चाहत्यांच्या कमेंट्सही येत आहेत.

या फोटोतील (Photo) कमेंट्समध्ये सर्वात आकर्षक नाव आहे ते हृतिक रोशनची एक्स वाइफ सुझान खान हिचं. या दोघांच्या फोटोवर सुझानने एक कमेंट केली, ज्याची आता सतत चर्चा होत आहे. सुझानने लिहिले, "सो क्यूट"

हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी 2000 साली लग्न केलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सध्या हृतिक अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे तर सुझानही अली गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT