Hrithik Roshan Birthday Instagram /@hrithikroshan
मनोरंजन

Hrithik Roshan Birthday: ह्रतिकच्या चाहत्यांसाठी खुशखबर! 'हे' धमाकेदार चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हृतिक रोशनने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटांबाबत अपडेट दिले आहे.

दैनिक गोमन्तक

Hrithik Roshan Birthday: बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता हृतिक रोशनसाठी आज ४९ वा वाढदिवस सादरा करत आहे. तसेच, 23 वर्षांपूर्वी याच महिन्यात हृतिक रोशनने 'कहो ना प्यार है' या पहिल्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

जानेवारीमध्येच पुन्हा एकदा हृतिक रोशनने त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल खास चर्चा केली आणि आगामी काळात हृतिकचे कोणते चित्रपट पाइपलाइनमध्ये समाविष्ट आहेत हे सांगितले. (Hrithik Roshan movie update)

हृतिक रोशनचा आगामी चित्रपट 'फाइटर' आहे. त्याची घोषणा यापूर्वीच झाली आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत बॉलीवूड सुपरस्टार अनिल कपूर आणि दीपिका पदुकोण हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. 

दरम्यान, पिंकव्हिलासोबतच्या संभाषणात हृतिक रोशनने त्याच्या मोस्ट अवेटेड 'क्रिश 4' चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. हृतिक रोशनने सांगितले की, 'क्रिश 4'ची तयारी सुरू आहे.

आम्ही या चित्रपटाचा (Movie) विचार करत आहोत. या वर्षाच्या अखेरीस चाहत्यांना 'क्रिश 4' बाबत मोठे अपडेट मिळतील अशी अपेक्षा आहे. 'वॉर 2' बद्दल बोलतांना त्याने सांगितले आदित्य चोप्राच्या मनात काय आहे आणि तो काय करणार हे कोणालाच माहीत नाही. 

मात्र सध्या काहीच केले जात नाही. प्रेक्षकांनी 'वॉर 2' ची नव्हे तर 'क्रिश 4' ची वाट पाहावी हे हृतिकच्या या विधानावरून स्पष्ट होते. 

फायटर'साठी हृतिकने केली खास तयारी

'फायटर' (Fighter) चित्रपटाबद्दल बोलताना हृतिक रोशन म्हणाला की, 'या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही खऱ्या फायटर जेटसोबत काम केले आहे. ज्यातून आपण एखाद्या फायटर जेट पायलटप्रमाणे जगणे, चालणे आणि शिस्त लावायला शिकलो आहोत. 

फायटरमधील पॅटीचे पात्र 'वॉर'मधील कबीरपेक्षा खूपच वेगळे आणि तरुण आहे. पुढच्या वर्षी जानेवारीत प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हृतिकचा 'फाइटर' रिलीज होऊ शकतो, अशी माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: आरक्षित डब्बा न जोडताच धावली कोकण रेल्वे; प्रवाशांना उभं राहून करावा लागला प्रवास

Goa Bus Accident: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी, वेर्णा येथे भीषण अपघात; चालकाविरोधात गुन्हा दाखल

Cricketer Threat: 5 कोटी दे...टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला अंडरवर्ल्डकडून धमक्या, दाऊद टोळीचं नाव समोर

Opinion: मायक्रोसॉफ्ट नाही, 'झोहो शो'! केंद्रीय मंत्र्यांनी दिला स्वदेशी सॉफ्टवेअरला 'प्राइम टाइम' बूस्ट

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

SCROLL FOR NEXT