Hrithik Roshan Instagram/@Hrithik Roshan
मनोरंजन

हृतिक रोशनने शेअर केला 'वेधा' चा नवा लूक

हृतिक रोशनने त्याच्या आगामी चित्रपट विक्रम वेधचा नवीन लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) आगामी चित्रपट 'विक्रम वेधा'ची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील हृतिक आणि सैफ अली खानचा फर्स्ट लूक यापूर्वीच रिलीज झाला आहे. दोघांच्या फर्स्ट लूकचे सोशल मिडियावर खूप कौतुक झाले. अलीकडेच हृतिकने त्याच्या वेधा या पात्राचा दुसरा लूकही शेअर केला आहे. वेधाच्या दुसऱ्या लूकवर फॅन्सच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. (Hrithik Roshan latest news)

हृतिकने (Hrithik Roshan) 'वेधा' चा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत 'Peace before the storm #channelingvedha' असे लिहिले आहे. या फोटोमध्ये पांढरा शर्ट, काळ्या फ्रेमचा गॉगल घातलेला आहे आणि तो आरशात स्वत:कडे पाहत आहे. या फोटोला दोन तासांत सात लाखांहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (Hrithik Roshan shares new Photo on Instagram)

* हृतिकचा वाढदिवस फर्स्ट लुक समोर आला होता

हृतिक वेधाच्या भूमिकेत तर सैफ अली खान (Saif Ali Khan) विक्रमच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी, हृतिकने त्याच्या वाढदिवसानिमित्त वेधचा फर्स्ट लूक शेअर केला होता. यासोबतच चित्रपटाच्या (Movie) प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली होती. विक्रम वेधा 30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होईल.

* विक्रम-वेधा हा तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक

या चित्रपटात हृतिक आणि सैफ व्यतिरिक्त राधिका आपटे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग पूर्ण झाले असून हा चित्रपट तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT