Housefull 5 Dainik Gomantak
मनोरंजन

Housefull 5: 'या' ठिकाणी होणार 'हाऊसफुल 5' चे शूटिंग; निर्मात्यांची मोठी घोषणा

Housefull 5: अक्षय कुमार, रितेश देशमुख यांच्यासह अनेक मोठे कलाकार या चित्रपटात दिसून येणार आहेत

दैनिक गोमन्तक

Housefull 5: प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या हाऊसफुल चित्रपटाचा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनात याविषयी उत्सुकता दिसून येत आहे. आता या चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

हाऊसफुल चित्रपटाचे निर्माते साजिद नाडीयावाला चित्रपटाविषयी वक्तव्य केले आहे. चित्रपट जगतात माझा नेहमीच हाच प्रयत्न आहे की, माझ्या प्रेक्षकांना चित्रपटाचा सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी सर्वोत्तम चित्रपट तयार करणे हा माझा उद्देश असल्याचे म्हटले आहे.

त्याचबरोबर, त्यांनी असेही म्हटले आहे की, हाऊसफुल ५ चे चित्रीकरण युकेमध्ये करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपण युके आणि सौदी अरेबिया या देशांसोबत भक्कम नाती तयार केली आहेत. याठिकाणी नेहमी घरासारखे वाटते आणि याआधी याठिकाणी शूटिंग करण्याचा अनुभवदेखील उत्तम असल्याचे म्हटले आहे.

पुढे ते म्हणतात, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास आम्ही प्रतिबद्ध आहोत. हाऊसफुल 5 प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होईल असे त्यांनी म्हटले आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे, भारतीय चित्रपटसृष्टीत एकाच चित्रपटाचे पाच भाग बनवणारा हाऊसफुल हा पहिलाच चित्रपट आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, हाउसफुल 5 पुढील वर्षी दिवाळीच्यावेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख यांच्यासह अनेक मोठे सितारे या चित्रपटात दिसून येणार आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT