Hot Actress Dainik Gomantak
मनोरंजन

Hot Scenes From Bollywood :आपल्या पहिल्याच चित्रपटात या अभिनेत्रींनी हॉट सीन्स देऊन आग लावली होती..

आपल्या पहिल्याच चित्रपटात काही अभिनेत्रींनी हॉट सिन्स देऊन चित्रपट लक्षवेधी केले होते...

Rahul sadolikar

चित्रपट हे समाजमनाचं माध्यम आहे. समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब चित्रपटात उमटत असते. मानवी भाव भावनांचा उत्कट अविष्कार चित्रपटात पाहायला मिळतो. प्रेम, राग, द्वेष, तिरस्कार या भावना पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळतात. शृंगार हा सुद्धा मानवी जगण्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. हाच शृंगार पडद्यावर दाखवताना दिग्दर्शक स्वातंत्र्य घेतात.

चित्रपटांमध्ये कधी पटकथेच्या मागणीनुसार तर कधी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी खूप बोल्डनेस वापरला जातो. इंडस्ट्रीत काम करताना हिरो-हिरोइन्सनाही या सत्याची जाणीव होते. सर्वच अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक बोल्ड सीन दिले आहेत.

 पण, अशा काही नायिका आहेत ज्यांनी आपल्या पदार्पणाच्या चित्रपटातच बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांच्या पहिल्याच चित्रपटात किसिंग सीन आणि बोल्ड सीन्स शूट करण्यात आले होते. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल....

अभिनेत्री मल्लिका शेरावतने 2022 मध्ये 'जीना सिरफ मेरे लिए' या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तिने 'ख्वाहिश' (2003) या चित्रपटातून मुख्य भूमिकेत पदार्पण केले. या चित्रपटात मल्लिकाने 17 किसिंग सीन दिले होते. त्यानंतर तिने 'मर्डर' या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत काम केले आणि यामध्येही खूप बोल्ड सीन्स दिले. 

Mallika Sherawat

अभिनेत्री ईशा गुप्ताने सीरियल किसर इमरान हाश्मीच्या 'जन्नत 2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात दोघांमध्ये अनेक इंटिमेट सीन्स शूट करण्यात आले होते. ईशा 'चक्रव्यूह', 'हमशकल्स', 'राज 3D', 'क्राइम ड्रामा' आणि 'रुस्तम' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Esha Gupta

बॉलिवूड इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे माही गिल. तिनेही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. माही गिलने प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या 'देव डी' चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात माहीने खूप बोल्ड सीन्स दिले होते.

Mahie GILL

सनी लिओनी तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. अनेकदा तिचे बोल्ड फोटोशूट व्हायरल होतात. अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर सनीने 'जिस्म 2' (2012) या चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपटात त्याने खूप बोल्ड सीन्स दिले होते.

Sunny Leone

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT