Honey Singh Divorce  Dainik Gomantak
मनोरंजन

Honey Singh Divorce : यो यो हनी सिंगचा लग्नाच्या 11 वर्षानंतर घटस्फोट, पोटगी म्हणून दिले इतके कोटी

प्रसिद्ध गायक हनी सिंगने पत्नी शानिली तलवारसोबत घटस्फोट घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक पार्टी गाणे देऊन रॅपचा नवा फ्लेवर आणणारा प्रसिद्ध गायक हनी सिंगने पत्नी शालिनी तलवारसोबत घटस्फोट घेतला आहे. त्यांचे 11 वर्षांचे लग्न आता संपले आहे. दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयातील कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश विनोद कुमार यांच्या न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे. गेल्या वर्षी त्यांच्या पत्नीने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात अनेक गंभीर आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

1 कोटींची भरपाई

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनी सिंगने सीलबंद कव्हरमध्ये शालिनी तलवार यांना पोटगी म्हणून एक कोटी रुपयांचा चेक दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 मार्च 2023 रोजी होणार असून त्यामध्ये पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पत्नीने केले गंभीर आरोप

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिने त्याच्यावर घरगुती हिंसाचार, मानसिक आणि आर्थिक शोषणाचे आरोप केले होते. हनी सिंगचे आई-वडील आणि लहान बहिणीने तिचे शोषण केल्याचा आरोप शालिनी सिंहने केला आहे. हनीमूनच्या वेळी हनी सिंगने आपल्यावर हल्ला केल्याचेही तिने सांगितले. लग्नानंतरही हनी सिंगचे इतर महिलांसोबत शारीरिक संबंध असल्याचा आरोप शालिनीने केला होता.

10 वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न

हनी सिंग आणि शालिनी तलवार लग्नाआधी जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघेही शाळेत भेटले. तिथून दोघांमध्ये मैत्री सुरू झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या जोडप्याने 23 जानेवारी 2011 रोजी पंजाबी रितीरिवाजानुसार गुरुद्वारामध्ये लग्न केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT