Mrunal Thakur  Dainik Gomantak
मनोरंजन

Hi Papa Teaser Out: मृणाल ठाकूरचा नव्या चित्रपटात रोमँटिक अंदाज

Hi Papa Teaser Out: मृणाल ठाकूरचे पात्र माहीबरोबर भावनिकरित्या जोडलेले दिसते.

दैनिक गोमन्तक

Hi Papa Teaser Out: दाक्षिणात्य सुपरस्टार नानी शेवटचा 'दशहरा' या चित्रपटात दिसला होता. आता नानी त्याच्या पुढच्या 'हाय नन्ना' ( HI PAPA ) या चित्रपटात दिसणार आहे. बाप-मुलीच्या नात्यावर ही कथा आधारित असून चित्रपटात रोमँटिक अँगल देखील असणार आहे.

चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत मृणाल ठाकूर आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात डबल धमाका पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर यूट्यूबवर रिलिज करण्यात आला असून चाहत्यांच्या पसंतीस पडल्याचे दिसत आहे.

नन्नाचा टीझर घरातील जेवणाच्या टेबलावर वडील आणि मुलीच्या संभाषणाने सुरू होतो. बाप आणि मुलीचे नाते हळूहळू उलघडताना दिसते. मृणाल ठाकूरचे पात्र माहीबरोबर भावनिकरित्या जोडलेले दिसते.

यावेळी नानी एक भावनिक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. 'है नन्ना'चा टीझर रिलीज झाला असून तो प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. बापाच्या भूमिकेतला नानी तुम्हाला नक्कीच आवडेल.

मृणाल ठाकूर आणि नानीची जोडी

नानी या चित्रपटात मृणाल ठाकूरसोबत ऑन-स्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. मृणाल या चित्रपटात अतिशय सुंदर दिसत आहे. या दोन लोकप्रिय कलाकारांना पडद्यावर पाहणेदेखील तितकेच मजेदार असणार आहे.

'हाय नन्ना' बद्दल

'हाय नन्ना' चे दिग्दर्शन शौर्यव यांनी केले आहे. चित्रपटाचे संगीत हेशम अब्दुल वहाब यांनी दिले आहे, ज्यांनी यापूर्वी विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू यांच्या 'खुशी' सारख्या चित्रपटांना संगीत दिले होते. 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

SCROLL FOR NEXT