Hema Malini and Dharmendra Dainik Gomantak
मनोरंजन

Hema Malini: हेमा मालिनीने धर्मेंद्रपासून वेगळ्या घरात राहण्याचे उघड केले रहस्य

Hema Malini: प्रत्येकाला एक नॉर्मल आयुष्य हवे असते.

गोमन्तक डिजिटल टीम

Hema Malini: बॉलीवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी चाहत्यांची लाडकी राहिली आहे. त्यांचे लग्न हादेखील चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय असतो. मात्र एकमेकांवर प्रेम असूनही ते वेगवेगळ्या घरात का राहतात असा प्रश्न चाहते नेहमीच विचारताना दिसतात.

आता स्वता हेमामालिनीने या एका मुलाखतीत या प्रश्नांचे उत्तर दिले आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिने दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. ती आणि धर्मेंद्र वेगवेगळे का राहतात ? ती स्वताच्या घरात एकटी राहत असल्यामुळे तीला फेमिनिस्ट आयकॉन म्हणून पाहिले जाते , या प्रश्नावर हेमामालिनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेमामालिनी म्हणते, कोणाला असे आयुष्य आवडते? प्रत्येकाला एक नॉर्मल आयुष्य हवे असते, घर हवे असते. त्या घरात तुमचा पती आणि तुमची मुले हवी असतात. सर्वांना आपल्या कुटुंब आणि मुलांसोबत राहायला आवडते. पण तरीदेखील मी काही कारणांमुळे या गोष्टींना वेगवेगळे केले.

मला या गोष्टींचे दुख नाही, मी माझ्या दोन्ही मुलींचे पालनपोषण केले त्यांना वाढवले याचा मला आनंद आहे. या सगळ्यात धर्मेंद्र नेहमीच माझ्यासोबत होते. धर्मेंद्र त्या वडीलांच्या पंगतीत बसतात ज्यांना आपल्या मुलांच्या लग्नाची काळजी असते. मी त्यांना म्हणत असे की सारे होऊन जाईल असे हेमामालिनीने म्हटले आहे.

दरम्यान, हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघांच्या लग्नाला 43 वर्षे पूर्ण झाली आहेत. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न झाल्यामुळे हेमामालिनीबरोबर लग्न करताना त्यांनी धर्म बदलला होता.

वयाच्या 19 व्या वर्षी धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते. मात्र बॉलीवूडमध्ये आल्यानंतर धर्मेंद्र आणि हेमामालिनी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले होते. ईशा देओल आणि अहाना देओल या त्यांच्या दोन मुली आहेत. आजही हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांचा चाहतावर्ग मोठा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

Porvorim Shooting Case: पर्वरी गोळीबारप्रकरणी आठवा संशयित मुंबईत जेरबंद; चुनाभट्टीत सापळा रचून गुन्हे शाखेची कारवाई

Pakistan Airstrike Afghanistan: गाढ झोपेत असताना काळाचा घाला! पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ला; लहान मुलांसह 22 ठार

Goa IDC E Auction: गोव्यात 50 भूखंडांचा ई-लिलाव; वेर्णा, लाटंबार्से अन् किटलातील भूखंडांसाठी 'आयडीसी'ची नोटीस जारी

SCROLL FOR NEXT