Harbhajan singhs New film poster  Dainik Gomantak
मनोरंजन

हरभजनच्या ‘फ्रेंडशिप' चा पोस्टर रिलीज

हरभजन सिंग(Harbhajan Singh) आपल्या नवीन इनिंगला सुरवात करतोय ती इनिंग आता कशी असेल हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने(Harbhajan Singh) 41 वर्षात पदार्पण केले असून त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एक खास भेट देण्यात आले आहे कारण त्याच्या 41 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने निर्मात्यांनी त्याच्या पदार्पणातील चित्रपट ‘फ्रेंडशिप’(Friendship)चे पोस्टर(Poster) प्रकाशित केले आहे.

या चित्रपटात अर्जुन सरजा, कॉमेडियन सतीश आणि लोसालिया मर्लियनेशनन देखील आहेत . हरभजन सिंगने या आधीही बॉलिवूड बद्दल असलेली आपली आवड अनेकदा दाखवून दिली आहे त्याने या अगोदर ‘प्रॉब्लम’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात कॅमिओ भूमिका केल्या आहेत. त्याचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रसिद्ध होणार असून सर्वांनाच त्याची उत्सुकता लागली आहे.

हरभजन सिंगने 2016 मध्ये शेवटचा सामना खेळला होता पण आता तो फक्त आयपीएलच खेळतो यावर्षीच्या आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सने 2 कोटींच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतले होते.

क्रिकेटच्या विश्वात आपले वर्चस्व गाजवत अनेक वर्ष त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले पण आता मात्र हरभजन सिंग आपल्या नवीन इनिंगला सुरवात करतोय ती इनिंग आता कशी असेल हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape Bicholim Cow Transport: गुरांच्या निर्दयी स्थलांतराच्या व्हिडिओवर उच्चन्यायालयाची दखल; ध्यान फाउंडेशनला अंतरिम दिलासा नाकारला

Horoscope: श्रावणाच्या दुसऱ्या दिवशी 'या' राशींवर भोलेनाथांची विशेष कृपा! नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणात यशाचे योग

Kushavati District Six Assembly Seats: कुशावती मतदारसंघांच्या मुद्द्यावरून गोव्यात राजकीय वाद! 8 पैकी 6 जागा जिंकण्याच्या काँग्रेसच्या दाव्यावर गोवा फॉरवर्ड अन् भाजपचा जोरदार हल्ला

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

SCROLL FOR NEXT