'Happy Family's Trailer Out  Dainik Gomantak
मनोरंजन

'Happy Family's Trailer Out : 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय'चा ट्रेलर रिलीज

'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे

Rahul sadolikar

'Happy Family's Trailer Out : मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक क्रांतिकारक बदल झाले आहेत. सिनेमा आता थिएटरमध्येच नाही तर घरीच आपल्या मोबाईल किंवा टिव्हीवर बघता येतो. वेब सिरीज आणि वेब फिल्मने मनोरंजनाची परिभाषा बदलली आहे. सगळ्या जॉनरचे चित्रपट आणि वेब सिरीज आता घरबसल्या बघायला मिळतात.

अमेझॉन प्राईम व्हिडिओने नुकताच आज आपल्या फॅमिली कॉमेडी सिरीज 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय'चा रोमांचक ट्रेलर रिलीज करून वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे.

या सिरीजमध्ये राज बब्बर, रत्ना पाठक शाह, अतुल कुलकर्णी, आयेशा जुल्कासह रौनक कामदार, मीनल साहू, सनाह कपूर आणि अहान साबू या कलाकारांना पाहायला मिळेल. आतिश कपाडिया आणि जेडी मजेठियाद्वारा निर्मित आणि दिग्दर्शित तसेच हॅट्स ऑफ प्रॉडक्शनच्या बॅनरची निर्मित असलेली, 'हॅप्पी फॅमिली: कंडीशन्स अप्लाय'ही एक एपिसोडिक रिलीज असेल.

पहिले चार भाग 10 मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर 240 पेक्षा अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रीमियर होणार असून, 31 मार्चपर्यंत दर शुक्रवारी 2 एपिसोड रिलीज होतील.

सिरीजचा हा ट्रेलर ढोलकियांच्या दुनियेत घेऊन जातो, जिथे एकाच घरात रहात असलेल्या ढोलकिया कुटुंबाच्या चार पिढ्यांना जीवनातील चढ-उतारांना एकत्र सामोरे जाताना पाहायला मिळेल.

जगासाठी भलेही ढोलकिया एक पिक्चर-परफेक्ट फॅमिली आहे परंतु इतर कोणत्याही कुटुंबाप्रमाणेच अकार्यक्षम असून, प्रत्येकाची स्वत:ची खास शैली, सूर आणि बोली आहे.

आतिष कपाडियाद्वारा लिखित 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय'या सिरीजमध्ये स्वाती दास, अतुल कुमार, करियुकी मार्गरेट वांजीकू, परेश गनात्रा, प्रणोती प्रधान, समर वर्मन्नी आणि नेहा जुल्का यांच्याही भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT